🎓सदिच्छा ग्रेट भेट : अजमेर शेख सर
( Delhi A. S Academy )
स्पर्धा परीक्षा विश्वातील विद्यार्थी प्रिय शिक्षक, व्यासंगी अभ्यासक,यशस्वी YouTuber, प्रेरणादायी वक्ते, आपल्या वक्तृत्वाने क्षणातचं आपल्या प्रभावी व्यक्तीमत्वाने अनेकांच्या मनात कायमस्वरूपी आपला अमिट असा ठसा उमटवीणारे स्नेहीं मित्र, फेसबुकच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून आपली वैचारिक मैत्री विविध सामाजिक आणि शैक्षणिक विषयांवरील चर्चेनें अधिक घट्ट होत.. परवा आपल्या भेटीचा प्रत्यक्ष योग आला तेही आमच्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन ह्या शैक्षणिक परिवाराला सदिच्छा भेटीतून...
मूळचे केज-धाराशिव बॉर्डर पट्यातले, अत्यंत हलाखीच्या आणि विषम परिस्थितीत स्वतःच्या पायावर उभं राहून उच्च-शिक्षण आणि कायदेक्षेत्रातील शिक्षण घेण्याचीं जिद्द..!
ग्रामीण भागात स्व:शिक्षणातून स्वत:ला सिद्ध करीत इतरांनाही प्रेरणा देण्याचं खूप मोठं सामाजिक कार्य उभं करून ग्रामीण युवांना सदैव प्रेरित करणारं कर्तृत्व आमच्या वैचारिक मित्र परिवारातील अभिमान असावा असा दिलदार आणि प्रभावी व्यक्तिमत्व म्हणजे अजमेर शेख सर..
आम्हास आपला सदैव सार्थ अभिमान मित्रां.. 🌹
आपल्या सदिच्छा भेटीत आपण आम्हास ही प्रेरित करून गेलात..
आपल्या पुढील कार्यास लक्ष लक्ष हार्दिक शुभेच्छा आणि सदिच्छा.
- आपलाच स्नेही🙏🏻
#विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख,
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन.
https://www.vidhyarthimitra.com
Post a Comment