संवाद हा लोकशाहीचा आत्मा आहे. एकमेकांची मतं पटोत अथवा न पटोत, संवाद संर्वांमध्येच हवा; मग तो कुणीही असो, अती उजवा अती डावा किंवा मध्यममार्गी...
संवादातूनच विचारांना चालना मिळते आणि नव्या स्वप्नांना पालवी फुटते. आजूबाजूच्या कर्कश कोलाहलात सध्या हा संवाद कुठं तरी खुंटत चालला आहे असं वाटण्यासारखी परिस्थिती अनुभवायला मिळते.
आजची समाज माध्यम लोकशाहीच्या त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला अधोरेखित करत लोकशाही जीवन शैलीत विश्वास असणाऱ्यांना आपली मते अभिव्यक्त करण्याचा अधिकार तर देते.. पण त्याचा दुरुपयोग वाढला असून, जागतिक पातळीवरील ही खुली आणि मुक्त संवादी माध्यमं...उजव्या विचार सरणीला पूरक ठरत.. डाव्याच्या विचारांना मारक ठरतं आहे.. आणि त्यांत ही सगळी माध्यम सरकार धर्जिण्य असल्यानं दिवसेंदिवस अभिव्यक्ती स्वातंत्र्य मूल्यांची होणारी गळचेपी सशक्त लोकशाही व्यवस्थेला गालबोटं लागणारी ठरतं आहे..
घटनात्मक कार्य मुल्यांशी फारकत घेतलेला सत्ताधारी आजकल दिवसेंदिवस धर्मांध, कट्टर,हेकेखोर, हुकूमशाही आणि फयसिस्ट होत असल्यानं येणाऱ्या काळात होणारा सामाजिक संघर्ष हा त्याच्या पतनास नक्कीच कारणीभूत असेल, ह्यात शंका नाहीं मित्रांनो.
माझं मत
#अभिव्यक्ती_स्वातंत्र्य
#निर्भयबनो..
-एक संविधान प्रेमी
@विद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख.
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
https://t.ly/ed766
Post a Comment