1) पायाभुत मूलभूत सुविधांची गॅरंटी..
2) आरोग्य सेवा आणि सुविधांची तत्परता..
3) सुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगार गॅरंटी...
4) आरोग्य आणि शिक्षणाचं राष्ट्रीयकरण करण्यात यावं..
5) घटनात्मक 'मोफत पण दर्जेदार ' शिक्षणाचीं हमी..
6) शेतमालाच्या पिकावर आलेल्या खर्चाच्या दीडपट किमान आधार भाव देण्याची कायदेशीर हमी.
7) दुष्काळग्रस्त भागात 'सिंचन व्यवस्था ' नदीजोड प्रकल्प हाती घेण्यात यावा.
8) शेतकऱ्यांच्या हितांचें कृषी धोरणे..
9) भाषिक आणि धार्मिक अल्प-संख्याकांना विशेष कायद्याअंतर्गत 'सुरक्षेचीं हमी ' त्यांच्या शिक्षण -आरक्षण -संरक्षण-संवर्धन साठी विशेष तरतूद.
10) सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या ( GDP) सर्वाधिक जास्त खर्च 'सार्वजनिक शिक्षण, आरोग्य आणि रोजगार निर्मितीवर करण्याचीं गॅरंटी..
11) रोजगार भरतीचीं गॅरंटी..
12) घरोघरी कमीत कमी किमतीत इंटरनेट जोडणी आणि जलद सुविधा..
13) महागाईवर नियंत्रण..
14) मागेल त्याला.. त्याच्या क्षमता आणि कौशल्यांप्रमाणे रोजगार सुविधा..
15) भ्रष्टाचारांवर नियंत्रण..
16) अविकसित जिल्ह्याचा 'औद्योगिक अनुशेष ' भरून काढा..
17) सार्वजनिक वाहतूक यंत्रणा अद्यवयत करणे.
18) सौरऊर्जेचा वापर अधिकाधिक होण्यासाठी 'जास्तीत जास्त ' सबसिडी देणे.
19) वंचित घटकांना 'सन्मानाने जगता यावं ' अश्या विविध योजना राबविणे.
20) LGBTQ समूहाला मुख्य प्रवाहात सामील करून घ्यावं, त्यांना सन्मानाने जगण्यासाठी कायदेशीर तरतूद करावी.
20)' संशोधन आणि विकास ' (R&D) क्षेत्रात स्थानिक गुणवत्ता विकसित करणे.
21) शिक्षण क्षेत्रात गुणवत्ता पुर्ण शिक्षकांची भरती करणे.
22) संविधानिक संस्थाच्या 'स्वायत्तेचं' संरक्षण असावं.
23) सार्वत्रिक आणि स्थानिक सर्वंचं निवडणुका निर्भेळ, निष्पक्ष वातावरणात पारदर्शी पार पाडण्यासाठी EVM किंवा कोणत्याही तांत्रिक साधनाचा वापर करण्यात येऊ नये.
24) सार्वजनिक जीवनात संविधानिक राष्ट्र-धर्माला प्राधान्य द्यावं.
25) जन-माणसात संविधान रुजविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात यावी.
26) सार्वजनिक आणि खाजगी सर्वं क्षेत्रात महिलांना 50 % आरक्षण देण्यात यावं..
27) जातनिहाय जन-गणना करून, जातीनिहाय त्या त्या समूहाच्या परिस्थितीचं योग्य आकलन करून त्यांना संविधानिक आरक्षण देण्यात यावं.
28) प्रत्येक राज्यात किमान 2 विशेष विद्यापीठ सुरू करून देशाच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, औदयोगिक, खेळ, विज्ञान -तंत्रज्ञान, सेवा, संशोधन तत्वज्ञान, साहित्य,उद्योग -व्यापार .. ई आदी क्षेत्रात जागतिक दर्जा असलेलं नेतृत्व विकसित करण्यासाठी पुढाकार घेण्यात यावा.
29) सर्वं-सामान्य माणसावर कोणत्याही बँकेचं 10 लाख रूपयांपर्यंतचं कर्ज आणि शेतकऱ्यांवरील कर्ज माफ करण्यात यावं.
30) समाजातील सर्वं वर्गासाठी 'सामाजिक सुरक्षेचं ' अभिवचन देण्यात यावं.
31) महानगरातील उद्योगधंदे आणि सेवा केंद्राचं विकेंद्रिकारण करून जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करून देण्यात यावं.
32) जिवनावश्यक वस्तूंवर 0% तर् सेवा उद्योगांवर 5 % आणि उद्योगधंद्यावर 7-10% GST असावी.
33) पर्यावरण स्नेहीं उद्योग आणि नगर विकास धोरणे असावीत.
34) नद्याजोड प्रकल्प कार्यान्वित करावा.
35) अतंरराष्ट्रीय सिमा आणि परराष्ट्र धोरण सार्वभौमत्वाला पूरक असावं.
36) क्षेत्रीय आणि स्थानिक भाषा साहित्य जतन-संवर्धन-नवं-निर्मितीला केंद्र आणि राज्यस्तरीय चालना द्यावी.
37) असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वं घटकांना विमा आणि पेन्शन सुविधा उपलब्ध करून देण्यात यावं.
38) धार्मिक दान हे सामाजिक आणि शिक्षणावर खर्च करावा.
39).......
40).......
क्रमश :
-एक जागृत मतदार आणि संविधान प्रेमी
#विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
Post a Comment