Capitalism (भांडवलशाही )
Intellectual (बौद्धिक )
bureaucracy(नोकरशाही )
Politician (राजकीय पुढारी )
Goons (गुंड )
हे पाच लोक समाजावर राज्य करतात. पुढारी आणि गुंड यातच सगळ्यात जास्त माणसाचा भरणा आहे. मागील एक दशकापासून राजकारणातून ही आपण बाद होऊ लागलो आहोत.
काळ मोठा कठीण असल्यानं आपण बदलत्या काळाच्या हाका ऐकायला हव्यात.
सुट्टीच्या दिवशी कोर्टासमोर सुनावणी होऊन जमीनही मिळतो. पैशाची ताकद खरंच अफाट आहे ती कुठलीही व्यवस्था सहज विकत घेते आणि वेठीस धरते..
इथं सर्वंसामान्यांच काय..?
त्यानं फक्त मतदान करावं आणि ह्या व्यवस्थेने लादलेल्या व्युवरचनेच्या चक्रात गुरफटावं...पिढ्यानं पिढ्या अन्याय सहन करत जगावं..त्याच्या जगण्यातल्या वेदनेवर संवेदनशील लेखक आणि पत्रकारांनीं लेखणीचं इंधनातून चूल लावीत त्यावरील तव्यांवर राजकारण्यांच्या अनेक पिढ्या राजकारण करीत पोसल्या जाव्यात..
हे या जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही देशात ( छुप्या सरंजामी आणि हुकमाशाही ) व्यवस्थेंला कलंकित आहे..
सरकार बदलेल..!आणि परिस्थितीहीं सुधरेल हा भाबडा आशावाद कईक पिढ्यानां आपल्या नैसर्गिक हक्कापासून वंचित ठेवणारा आहे.
क्रमश :
- #विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख
🎓डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
https://www.vidhyarthimitra.com
Post a Comment