कारण त्यांना माहीत असते कीं समोरच्याशी प्रत्यक्ष जीवनात आपला कधीही संबंध येणार नाही....याच्यावाचून आपले काहीही अडत नाही आणी हा कधीही आपल्या उपयोगात देखील येणार नाही त्यामुळे याच्याशी कसेही वागले बोलले , उपहास केला , अपमानित केले, व्यक्तीला नं जाणता त्याचं चारित्र्यहनन केले तरी हा कुठे आपल्याला आडवा येणार आहे..?
स्व:केंद्री असलेलं व्यक्तीत्व ज्यानं आपला सदसदविवेक गहाण ठेऊन... चार चौघात वावरताना सामाजिकतेचं भान हरपलेली काही मंद आणि अंधभक्त मंडळी ह्यात लई पुढं पुढं दिसतात बरं का..!
खरे तर प्रत्यक्ष जीवन जगत असतांना आपले नातेवाईक , मित्र , परिवार, सहकारी व आपल्या अवतीभवतीचा समाज प्रत्येक वेळी आपल्या विचारांशी सहमत असणारच असतो असे नाही..
उलट टोकाचे भिन्न भिन्न विचारांचे मित्र वा सहकारी असतात आपले...पण म्हणुन आपण त्यांच्याशी वा ते आपल्याशी उद्धटपणे नाही वागत..
विचार भिन्न असूनही आपण संबंध तोडून टाकत तर नाहीच , उलट एकमेकांशी जुळवून घ्यायचाच प्रयत्न करतो..
कारण त्याचा आपला प्रत्यक्ष संबंध आलेला असतो व तो संबंध टिकून राहण्यासाठी आपण आग्रही असतो..
डबक्यात साचलेली कट्टर मानसिकता नेहमीच प्रवाहीत असलेल्या विवेकी आणि तर्कसंगत विचारांना नेहमीच विरोध करते.. पण तो प्रवाह वेळेला आणि सत्येला साथ देणारं असेल तर त्याला कोणीही थांबवू शकत नाहीं..
खुल्या आणि मुक्त विचारांना प्राधान्यक्रम देणारी आजची हीं समाज माध्यम आज खऱ्या अर्थाने 'वैचारिक क्रांती ' करणारी ठरत असून.. मानवी विकास टप्प्याचा साक्षीदार होत आहेत..
समाज माध्यमांवर आपलं वागणं हे विवेकी आणि कालसुसंगत असावं... आपलं म्हणणं एकमेकांवर थोपविण्यापेक्षा त्या विचार समजाची व्यक्तीस्थल काल-निरपेक्ष समीक्षा करून त्यांत बदल करून स्वीकारावं आणि पुढं व्हावं असं मला वाटतं मित्रांनो.
क्रमश :
संपादित :
#विद्यार्थीमित्र
Post a Comment