ग्रॅण्ट रोड मुंबई येथे युवा नेतृत्व विकास संवाद कार्यशाळेच्या निमित्ताने दोन दिवसीय मुक्कामी अभ्यास दौऱ्यात खूप काही शिकलो..
दरवेळच्या मुंबई भेटीत नवं आकर्षण नेहमीच असतं..भरगच्च माणसांच्या मुंग्या सारख्या गर्दीत नित्य नवं ठिकाणे आणि नवी माणसं एक नवा विचार देऊन जाताना स्वतःला अंतरमुख करतात आणि नवी प्रश्न आणि नव्या आव्हानांना पेलण्याचीं क्षमता निर्माण करण्याचं एक नवं बळ देतात..
महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या वैचारिक प्रेरणेतून निर्माण झालेलं सर्वोदय मंडळ ,पुण्याचं SM Joshi Socialist Foundation, राष्ट्र सेवा दल, अखिल भारतीय शिक्षण हक्क सभा,मुस्लिम सत्यशोधक मंडळ, सामाजिक परिवर्तनवादी चळवळ,पुरोगामी संघटना,मराठी साहित्य परिषद, सेवाग्राम वर्धा, कबीर कला मंच, शहीद भगत सिंग विचार मंच, Bright Society, Aspire Education Foundation, लोकायत चळवळ, समाजवादी शिक्षण मंच, अंधश्रदा निर्मूलन समिती महाराष्ट्र, विवेकी भारत चळवळ, Rational Thinker Group, अखिल भारतीय जनहक्क आंदोलन, बामसेफ, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ.. ई आदी पुरोगामी सामाजिक संघटनांचीं कार्य-प्रेरणा, सहकार्य आणि भक्कम वैचारिक पाठबळ आणि मार्गदर्शन शालेय शिक्षणापासून आजतायागत पाठीशी असताना 'सामाजिक आणि शैक्षणिक' लढ्याच्या संघर्षात दिवसेंदिवस नवं नवं आव्हानांत्मक प्रश्नाच्या पाठपुराव्यासाठी आणि मार्गदर्शनासाठी नेहमीच मुबंई वारी ठरलेली असतेचं..
मी एक संविधान प्रेमी आणि विवेकी अभिव्यक्ती असलेली 'असामी ' आहे.. जन्माने मुस्लिम पण बुद्धीप्रामाण्यावादी सच्चा भारतीय मुस्लिम जो संविधानिक मूल्यांना 'धर्मापेक्षा' जास्त मानवतावादी मूल्यांना आणि निसर्ग नियमांप्रमाणे आपलं विवेकी आचरण असलेला 'अत्त दीप भव ' कडे आपला जिवन प्रवास करणारा एक वैचारिक बुद्धिजीवी प्राणी..
व्यवसायाने एक खाजगी शिक्षक, ज्याने प्रस्थापीत व्यवस्थेंचा भाग नं बनता स्वतःचं अस्तिव सिद्ध केलंय.. ते वंचित, दुर्लक्षित, उपेक्षित, अन्यायी, गोर-गरीब, संघर्षरत, कष्टकऱ्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक विकासाच्या लढ्यासाठी..
सन 2001 सालापासून एसके क्लासेस, सन 2012 पासून डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन आणि सन 2020 पासून The Spirit of Zindagi Foundation च्या माध्यमातून राज्यभर शैक्षणिक आणि सामाजिक कार्य करीत दिवसागणिक अनेक माणसांचं स्नेह -सहकार्य आणि मार्गदर्शन नेहमीच आमच्या कार्यास एक प्रेरणादायी बळ निर्माण करीत विविध समाज माध्यमांवर मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि घेतली गेलेली दखल हे सर्वं आमच्या प्रामाणिक कार्याची पोच पावती आहे मित्रांनो..
येणाऱ्या काळात 'संस्थात्मक काम' व्यापक स्वरूपात उभं करण्याचीं तीव्र ईच्छा आहे मित्रांनो..
आपलं स्नेह-सहकार्य आणि प्रेम असंच कायम पाठीशी असू द्या हीं विनंती.कुठं चुकतं असेल तर नक्कीच कळवा.. आपल्या सर्वं सकारात्मक सूचनांच स्वागतचं..आम्ही रचनात्मक कार्यासाठी त्याला अवश्य प्राधान्य देऊ मित्रांनो.. 🙏🏻
-आपलाच एक वैचारिक मित्र
#विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख,
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
https://bit.ly/45WHCyt
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Post a Comment