सर्वोदय मंडळ आणि गांधी बुक डेपो ग्रॅण्ट रोड मुंबईच्या संयुक्त विद्यमाने आदरणीय विजय दिवाण सर ( ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते ) आणि डॉ. विवेक कोरडे सर ( राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ते, मुंबई ) यांच्या पुढाकारानें यशस्वी राजकारण करण्याची आकांक्षा असणाऱ्या व राजकीय वारसा नसलेल्या तरुणांसाठी एकदिवसीय युवा नेतृत्व संवाद कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं..
राज्याच्या कानाकोपऱ्यांतून आणि मुंबईतून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तिनी ह्या कार्यशाळेत आपला सहभाग नोंदवत आजच्या काळातल्या लोकशाहीला सक्षम युवा नेतृत्व प्रदान करण्यासाठी संविधानिक पद्धतीने कार्य करण्याचीं प्रेरणा निर्माण करण्यासाठी एक कृती कार्यक्रम आखण्यात आला आहे.
ह्या युवा नेतृत्व विकास संवाद कार्यशाळेत पुढील निर्णय घेण्यात आले आहेंत...
🔰संस्थात्मक कार्य :
1) ध्येयवादाचे राजकारण करण्यासाठी प्रेरित झालेल्या तरुणांचा एक गट बनविणे, या गटाला वैचारिकदृष्ट्या सक्षम करणे, राजकारणाच्या दृष्टीने प्रगल्भ बनविणे आणि या गटाच्या माध्यमातून सामाजिक अभिसरण घडवून आणून राजकारणाला समाजाभिमुख दिशा देणे.
2) समाजाची संवेदनशीलता वाढविण्यासाठी उपक्रम राबविणे.
३) राष्ट्रीय एकात्मकता, सांप्रदायिक सद्भावनांसाठी विविध उपक्रम राबविणे.
4) वर्षातून दोन वा तीन वेळा एकत्र येऊन अनुभवांची देवाणघेवाण करणे आणि विविध विषयांवर अभ्यासपूर्ण चर्चा करणे.
5) विविध प्रश्नांवर स्थानिक पातळीवर निदर्शने, चर्चासत्र, आणि परिषदा यांचे आयोजन करणे. अशाप्रकारे जर सातत्याने 10-15 वर्षे प्रयत्न केले तर त्यातून एक गंभीर, प्रगल्भ आणि प्रामाणिक नेतृत्व निर्माण होईल असा आमचा विश्वास आहे.
6) वय वर्ष 20 ते 45 या वयोगटातील तरुणांसाठी विविध पातळीवर युवा संघटन तयार करून त्यांना प्रशिक्षीत करणे.
🔰 सर्वसाधारण कार्यक्रम :
१) ब्लड ट्रान्सफ्युजन सोसायटी स्थापित करणे.
२) चांगली पुस्तके वाचण्यासाठी उपलब्ध करून विद्यार्थी आणि तरुणांना वाचन प्रवृत्त करणे.
३) हायस्कूल आणि शाळांमधून राष्ट्रीय एकात्मता, सांप्रदायिक सद्भावना, समता यांना गती देणाऱ्या चित्रपटादी कार्यक्रमांचे आयोजन करणे.
४) धार्मिक ऐक्यासाठी बलिदान दिलेल्या गणेश शंकर विद्यार्थी, वसंत-रजब इत्यादींच्या स्मरणार्थ व्याख्यान, चर्चासत्र, कार्यशाळांचे आयोजन करणे.
५) प्रौढ आणि तरुणांचे अभ्यास वर्ग चालवणे. त्याचबरोबर विविध विषयांवर चर्चासत्रांचे आयोजन करणे. सांप्रदायिक सद्भावनेसाठी योगदान देणाऱ्या स्थानिकांचा गौरव करणे.
नवी तीर्थस्थळे :
१) डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, शहीद भगतसिंग यांच्या समाधी ही भारताची नवी तीर्थस्थळे आहेत. या तीन स्थळांची (मुंबई, दिल्ली, पंजाब) राष्ट्रीय एकात्मता यात्रा दरवर्षी आयोजित करणे.
२) डॉ. आंबेडकर, महात्मा गांधी, शहीद भगतसिंग यांच्या जन्मदिनी आणि/वा स्मृतिदिनी विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे. प्रत्येक कार्यक्रमात जाणीवपूर्वक दलित, अल्पसंख्य, आदिवासी आणि महिलांचा सहभाग वाढविणे.
३) लिंगवाचक शिव्यांच्या विरोधात जागृती मोहीम चालविणे.
४) महाविद्यालयान विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्त्व, काव्य, भित्तीचित्र, पथनाट्य इत्यादी स्पर्धांचे आयोजन करणे.
संघर्षात्मक कार्यक्रम :
१) जगण्याच्या अधिकारात अंतर्भूत शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि घर यांचा समावेश मूलभूत हक्कांमध्ये व्हायला हवा.
२) सर्वांना समान आणि दर्जेदार शिक्षण मिळायला पाहिजे याचा आग्रह.
३) तालुका आणि जिल्हा पातळीवर प्रत्येक हजार लोकसंख्येमागे एक बेड या प्रमाणात मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स असायला हवी.
४) रोजगार देणे ही सरकारची जबाबदारी आहे. देऊ न शकल्यास प्रत्येक बेरोजगार तरुणास दरमहा ₹ 5000 बेरोजगार भत्ता मिळाला पाहिजे.
५) प्रत्येक कुटुंबाच्या डोक्यावर छत असलंच पाहिजे.
६) अन्यायकारक घटनांविरोधात निदर्शने.
७) स्थानिक समस्यांवर निदर्शने.
निर्णय :
उपक्रमः वैयक्तिक आणि सामूहिक त्याच बरोबर स्थानिक आणि संघटना म्हणून
निदर्शने : पक्ष व पक्षाची मान्यता नसेल तर संघटना म्हणून.
'संघटनाः नवी करायची की उपलब्ध बॅनर वापरायचे? वर्षातून किती वेळा भेटायचे?
अ) नेतृत्व गुण, वक्तृत्व, विविध विषयांची आणि राजकीय विचारसरणीची समज वाढवण्यासाठी अभ्यास वर्ग,
ब) करीत असलेले उपक्रम, प्रतिसाद, एकत्रित उपक्रम, नवीन उपक्रम, एकमेकांना सहाय्यक कसे व्हायचे याविषयीची चर्चा...
🔰 स्थळ :* मुंबई सर्वोदय मंडळ / गांधी बुक डेपो, 299 ,
ताडदेव रोड, नाना चौक, ( ग्रँड रोड वेस्ट, भाजी गल्ली )
मुंबई-400 007.
🔰 मुख्य आयोजक आणि संयोजक :
🎓विजय दिवाण ( जेष्ठ सर्वोदयी आणि सामाजिक कार्यकर्ते )
🎓डॉ. विवेक कोरडे (राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ते )
🔰 समन्वयक : विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख
(डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन ,परभणी.)
अधिक माहितीसाठी संपर्क : 9833075606 , 9822624178
Post a Comment