"दिल्ली है दिलवालों का शहर,
जहाँ हर गली में कहानी बसती है,इमारतें नहीं,
इतिहास की धड़कनें हर कोने में रचती है।"
दिल्ली मेट्रोच्या गर्दीत हरवलेला 'दर्दी माणूस'...
खूप दिवसांनी यंदाच्या दिल्ली वारीत 'मेट्रो' सफर करण्याचा योग आला..
Delhi NCR परिसरातील Noida Sector 59 तें Delhi Airport Terminal -3 पर्यंतचा भरगच्च गर्दीत स्वतःचीं वाट मोकळी करत.. इथल्या स्थानिक चाक्कर मान्य प्रवासीचीं बिकट अवस्था.. कोंबून भरलेले भरगच्च लोकं, मोकळं श्वास तरी घेतात कीं नाहीं रं बाबा..
बाहेरच्या प्रचंड उकाड्यापासून मुक्ती, मेट्रोचीं AC हवा, नं संपणारी रहदारीं, प्रचंड वाहतुकीचा ताण, उद्योग सेवा, BPO कॉल सेंटर, आय टी ट्रेनिंग सेंटर मधून निघणारी IT Professionals, व्यवसायिक, सेवा उद्योग कार्यक्षेत्रातील व्यवस्थापक, विद्यार्थी यांच्या गप्पागोष्टी आणि माना खाली घालून फोनमध्ये खूपसलेलं त्यांचं तोंड.. ई.. आदी गोष्टी अवर्णीयचं बाबा...
एका तासाच्या भर गर्दीतं हा लेख लिहण्यास प्रेरीत केलंय.!
अत्याधुनिक सेवा सुविधा,भौतिक प्रगती, रोजगारांच्या असीमित सेवा उपलब्धी, तंत्रज्ञान सक्षमता, खणखर राजकीय नेतृत्व, सुंदर शहराचीं रचना, उद्योग अनुकूल धोरणे, देशाचं शैक्षणिक - राजकीय केंद्र, स्वातंत्र्य लढ्याचं केंद्र, स्वच्छता, हरितपणा,ऐतिहासिक आणि गौरवशाली परंपरा लाभलेलं दिल्ली ' सुंदर शहरांचा बगीचाचं.!'
आजच्या धावपळीत JNU ला पून्हा एकदा भेट देण्याची खूप ईच्छा होती, तिथलं वातावरण आणि विद्यार्थी संघटनांचा राजकीय आखाडा, देशातील बुद्धीजींवीचीं मातृभूमी, अनेक मातब्बर राजकीय नेत्यांच्या सामाजिक समीकरणांचीं ज्वलंत प्रयोगशाळा, प्राच्याविद्या पंडीत कॉमरेड शरद पाटलांच्या सौमा तत्वज्ञानातील जयभिम लाल सलामच्या घोषनांनी दुमदमनारं परिसर, डाव्या चळवळीचं माहेर घर, अनेक बुद्धीजीवी लेखकांना, पत्रकारांना प्रेरित करणारं वातावरण असलेलं जवाहरलाल नेहरू केंद्रीय विद्यापिठं.. आजच्या धावपळीत Indira Gandhi Domestic and International Airport वर परतीच्या प्रवासासाठी Flight घेण्यासाठी धाकधुकचं...
क्रमश :
- एक प्रवासी वाटाड्या...
#विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
#DelhiCapitals, #delhiuniversity, #विद्यार्थीमित्र,#सफरनामा #DelhiNews, #delhiheritage, #delhimetro, #noidacity
Post a Comment