आपण कितीही बुध्दीमान असलो, हुशार असलो तरी त्याचा गर्व करायचं नाही. प्रत्येकाकडे काहीना काही सद्गुण असतो. कोणाचे अक्षर चांगले असते तर कोणाच्या बोटात चित्रकलेची जादू असते.
जे नाही त्यासाठी नाराज राहण्यापेक्षा ते मिळवण्याचा प्रयत्न तर करूच पण जे आहे त्याचा वृथा अभिमान बाळगू नये हे लक्षात ठेवू. जे जमेल ते इतरांना शिकवण्याचा, देण्याचा प्रयत्न करत रहा. त्यातून मिळणारा आनंद वेगळेच समाधान देतो.
मुलांनो, प्रत्येकाचे व्यक्तिमत्व वेगळे असते. कोणाची कार्बन कॉपी होण्यापेक्षा आपणच आपले वेगळेपण जपू. सहकाऱ्यांना मदतीचा हात देऊ. त्यांना शाब्बासकीची थाप देऊ...
जीवनात दुसऱ्यांसाठी जमेल ते काही तरी करत रहा.😊
- एक प्रयोगशील शिक्षक :
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख,
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
https://www.vidhyarthimitra.com
Post a Comment