" ज्ञानामुळे मानवी जीवनात क्रांती झाली. ज्ञानाने अज्ञानावर मात केली आणि जीवन बदलले. माणूस स्वतंत्र झाला. जीवनाला अभिव्यक्तीमिळाली. माणसाने उभारी घेतली, प्रगती केली.त्या प्रगतीत सातत्य राखण्यासाठी, ज्ञानाच्या प्रेषितांनी केलेल्या बदलाप्रती कृतज्ञ होत ज्ञानाच्या नवजागरणासाठी...
आपण सारे सज्ज होऊयात...! "
🔰 कोनशीला कार्यक्रम - Asian Minorities University (AMU- Solapur ) आणि अल्पसंख्याक शैक्षणिक समन्वय परिषद- 2024 सोलापूर...
अलीगढ मुस्लिम विद्यापिठाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण भारतात ( दख्खन प्रांत ) सोलापूर येथे... मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, राजकीय, आर्थिक आणि सामाजिक उत्थापनासाठी.. मुस्लिम समाजातील बुद्धीजीवी आणि सामाजिक कार्यकर्त्याच्या सर्वकष प्रयत्नांतुन समाजाच्या सर्वोत्तपरी विकासाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या ऐतिहासिक घटनेच्या क्षणाचं आज सोलापूर येथे साक्षीदार होता आलं.. ह्याचा आज परम आनंद झाला आहे..
शैक्षणिक-सामाजिक कार्यक्षेत्रात कार्य करत असताना जाणवणारं..मुस्लिम समाजातील असलेलं शिक्षणाचं प्रमाण.. आणि मुख्य प्रवाहात असलेलं मुस्लिम समाजाचं स्थान.. दिवसेंदिवस वाढत जाणारी सामाजिक आणि आर्थिक विकासातील दरी.. ई.. आदी गोष्ट नक्कीच हीं परिषद आणि AMU- Solpaur भरून काढण्यासाठी मोलाचं योगदान देईल असा आशावाद बाळगूया..
📚 एशियन मायनॉरिटी युनिव्हर्सिटीची ध्येय उद्देशिका...
🔰 प्रेषितांनी अखेरच्या हजयात्रेतील उद्घोषणे अनुरुप प्रतिज्ञा..
मानवी हक्कांचा सरनामा..
एशियन मायनॉरिटी युनिव्हर्सिटीच्या उद्देशिकेंतुन...
🔰 जगातील सर्व मानवजात एकसमान आहे. ती सर्व मानवाची म्हणजेच संतती म्हणून समतापूर्ण व्यवहाराचा अधिकार बाळगते. आम्ही प्रतिज्ञा करतो की, आम्ही त्यांच्यात कोणत्याही पध्दतीचा भेद करणार नाही.
🔰 ज्यावेळी आम्ही अज्ञानी होतो. त्या काळात आम्ही अनेक अनिष्ट रुढी, प्रथा, परंपरा यांचे पालन केले. प्रेषितांच्या चळवळीची फलश्रुती म्हणून आम्ही आमच्या ज्ञानावर आधारित जीवन जगण्याचा प्रयत्न करु. जिवनाला पदोपदी उन्नत करण्याची ज्ञाननिष्ठा आज आम्ही स्विकारत असल्याची घोषणा करत आहोत.
🔰 प्रेषित मोहम्मद (स.) यांनी घालून दिलेल्या शिकवणीनुसार आम्ही हे घोषित करतो की, आम्ही समाजात आर्थिक विषमता निर्माण होईल अशी कोणतीही कृती करणार नाही. आम्ही व्याजाचे व्यवहार निषिध्द मानतो. कारण ते अन्यायाचे, आर्थिक शोषणाचे उगमस्थान आहे.
🔰 स्वातंत्र्य ही आमची जीवननिष्ठा आहे. प्रेषितांनी गुलामीला नकार दिला होता. आम्ही कोणीही, कोणत्याही पध्दतीने लादत असलेल्या गुलामीविरोधात लढण्याची प्रतिज्ञा करतो.
🔰 रक्तपात, हत्या, लुटमार यांना आमच्या जीवनात कसलेच स्थान नसेल. शोषणविरहीत सन्मानित जीवन जगण्यासाठी आम्ही आज सिध्द होत आहोत.
🔰 आम्ही कोणाच्याही संपत्तीचा वा इतर कसलाही हक्क लुबाडणार नाही. आम्ही एकमेकांचा सन्मान करु. अपमानजनक ठरेल अशी कोणतीही कृती करणार नाही.
🔰 जीवन ही ईश्वरी देणगी आहे, त्यामुळे आम्ही त्याचा सन्मान करण्याची प्रतिज्ञा करतो.
🔰 प्रेषितांनी दिलेल्या शिकवणीनुसार आम्ही हे घोषित करतो की, आम्ही वर्ण, जात, वंश व प्रदेशाच्या आधारे मानवजातीत भेद करणार नाही. त्याआधारे कोणालाही उच्च वा नीच समजणार नाही.
🔰 स्त्री ही जननी आहे. तिच्याशी न्यायपूर्ण व्यवहार करण्याची आम्ही प्रतिज्ञा करतो. तिच्यावर कोणत्याही पध्दतीचा अन्याय होणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ.
प्रेषितांनी अखेरच्या हजयात्रेत केलेली उद्घोषणा, ज्याला मानवी हक्कांचा सरनामा म्हटला जातो, तो आम्ही आमची जीवननिष्ठा म्हणून स्विकारत आहोत.
आज दिनांक : 3 नोव्हेंबर 2024
स्थळ : सोलापूर
निमित्ताने : एशियन मायनॉरिटी युनिव्हर्सिटीच्या स्थापना दिन..
-स्नेहांकीत
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख,
डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
#अल्पसंख्यांक_शैक्षणिक_समन्वय_परिषद_२०२४_सोलापूर #सोलापूर #शैक्षणिक_परिवर्तन #शिक्षण_परिषद #आर्थिक_परिवर्तन #पालकांना_आधार_देऊया #पाल्यांना_शिक्षण_देऊया #मुस्लीम_सशक्तीकरण #national_educational_convention #solapur #Education #renessaince
Post a Comment