" ज्या प्रवासात ज्ञान, अनुभव, आणि आत्मशोध मिळतो तो खरा प्रवास असतो."
जगणं समृद्ध करणाऱ्या जीवन प्रवासातील वाचन आणि प्रवास हा अत्यंत प्रेरणादायी अनुभवचं..! पुस्तकं आणि माणसं वाचणे.. माझ्या अनुभव विश्वातील एक विलक्षण बाब.. शैक्षणिक आणि सामाजिक कार्यक्षेत्रात गेल्या दोन दशकांपेक्षा जास्त काळ संघर्षरत आयुष्याला खऱ्या अर्थानं अर्थपुर्ण केलं तें ज्ञानलालसेने आणि ज्ञानउपासनेंनें.. त्याला उत्तमं जोड दिली.. ती विविध ठिकाणी होणाऱ्या अनेक शैक्षणिक आणि सामाजिक कार्यक्रमांच्या निमित्ताने घडलेल्या प्रवासानं..
शालेय आणि महाविद्यालयीन आयुष्यात लाभलेले अनुभव ज्ञान-संपन्न शिक्षक, विविध जाती-जमातीचें मित्र , विभिन्न विचारधारा असलेले मार्गदर्शक मंडळी, SFI विद्यार्थी संघटनेतील वैचारिक मित्र, आंबेडकरीं चळवळीतील नेते, बामसेफ आणि संभाजी ब्रिगेड...सामाजिक चळवळीत काम करणारे कार्यकर्ते मित्र ,वडिलांचें सम-विचारी वडीलधारी ज्येष्ठ मंडळी... ई.. आदीनी नेहमीच मार्गदर्शन करतांना स्व:जिज्ञासेंला जागृत केलं आणि विवेकाची कास धरली..
शालेय शिक्षणात वाचनातुन भेटलेले महात्मा गांधी,भगतसिंग, महात्मा फुले , डॉ. बाबासाहेब आंबेडकर.. साने गुरुजी, किशोर मासिक वाचन, इतिहास विषयातील रंजकता आणि समाज विज्ञानातील अभिरुची... महाविद्यालयीन शिक्षणात.. स्व:अस्तित्वाच्या शोधाला आणि वैचारिक जिज्ञासेला साद घालणारें कार्ल मार्क्स, एम्युअल कांट, चे ग्वेरा, लेनिन, डार्विन, व्हाल्टेअर,गौतम बुद्ध,गोर्की, कॉमरेड अण्णाभाऊ साठे,फेड्रिक नित्शे,स्टॅलिन, रशियन साहित्यकार लिओ टॉलस्टोय, शेकस्पीअर,पेरियार, खलील जिब्रान, निसर्गवादी आणि साम्यवादी पाश्चत्य तत्वज्ञानी.. ई..आदीच्या साहित्यांतुन आयुष्याला योग्य दिशा मिळाली आणि जीवनाचं ध्येय कळलं..
पुस्तक वाचनातुनचं वैचारिकतेला प्रगल्भता आणि वाणीला प्रभावीपणा आला..दिवसाची सुरूवात ती ठरलेली किमान पाच वर्तमानपत्र वाचून...आठवडयात दोन पुस्तकं फस्त करून आणि त्यासोबत... दररोज समाज माध्यमांवरील प्रबोधनात्मक विचार प्रवाह आणि द्वंद..यांतुन अद्यवयतपणा आपल्या जीवन कौशल्यांना धार देण्यासाठी कधीहीं सज्जचं..
मी आज सकाळी परभणीहुन निघालोय सोलापूरला.. उद्या दिनांक 3 नोव्हेंबर, रविवार 2024 रोजी सोलापूर येथे संपन्न होणाऱ्या Asian Minority University (AMU- Solapur ) ह्या विद्यापिठाच्या कोनशीला कार्यक्रम आणि राज्यस्तरीय अल्पसंख्याक शैक्षणिक समन्वय परिषदेसाठी.. आमचे स्नेहीं विद्यार्थी मित्र ऍड. शोयबोद्दीन सिद्दीकी यांच्यासोबत.. एका ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी.. जो मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक आणि सामाजिक.... संविधानात्मक न्याय आणि हक्कांसाठी.. शैक्षणिक केंद्र असेल AMU-Solapur साठी..
आजच्या अविवेंकी समाज परिवेशात धार्मिक यात्रांपेक्षा आयुष्यं समृद्ध करणारं एक नवं ज्ञान - पर्यटन जो साद घालेल आपल्या विवेकाला.. आपल्या सामाजिकतेला..आपल्या अंतरआत्म्याला.. आपल्या भौतिक आणि सामाजिक विकासाच्या गतीला, सामाजिक जाणीवेला आणि जागरूकतेला.. जो खऱ्या अर्थानं आयुष्याच्या सच्या आनंदाच्या अनुभूतीला...ती प्रदान करेल निर्भयता आणि निर्भीडता.. अविवेकाच्या अंधारात लपलेल्या भितीला मात करेल विवेकाचा ज्ञान प्रकाश...
क्रमश:
- एक जीवन प्रवासी वाचक
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख,
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
https://www.vidhyarthimitra.com
Post a Comment