महफूज़ रख, बेदाग रख, मैली ना कर ए जिंदगी...!
मिलती नहीं इंसान को किरदार की चादर नई...!!
जिंदगीचं सारं खरं तर याच दोन ओळींमध्ये आहे. व्यक्तीचं चारित्र्य, त्याचा स्वभाव आणि त्याच्या आयुष्याचं पावित्र्य म्हणजेच त्याच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख. माणूस काय कमावतो, किती पैसा मिळवतो, ते नक्कीच महत्त्वाचं आहे; पण त्याच्याही पेक्षा महत्त्वाचं असतं, माणसाचं चारित्र्य आणि त्याचा स्वभाव.
चारित्र्य म्हणजे माणसाची खरी संपत्ती. आपला आचार विचार, आपलं वर्तन आणि इतरांसोबत आपली स्नेह वागणूक यांवरच आपली ओळख असते.
पैसा, प्रतिष्ठा, यश ह्या सर्वं बाह्य गोष्टी असल्या तरी अंतर्गत चारित्र्य हा एका माणसाला शाश्वत बनवणारा गाभा आहे. एकदा हे चारित्र्य मळलं की त्याला पुन्हा नव्या चादरी मिळत नाहीत.
आयुष्याच्या या प्रवासात अनेक वेळी विविध विपरीत परिस्थिती येतात. संकटं येतात, संधी येतात, थोडक्यात म्हणायचं झालं तर वेळोवेळी आपल्या चारित्र्यावर परीक्षेचा प्रसंग येतो. पण कितीही आव्हानं आली तरी त्यातून स्वतःला पवित्र ठेवणं, निष्पाप ठेवणं म्हणजेच आपलं व्यक्तिमत्त्व आणि चारित्र्य टिकवून ठेवणं.
आपण आयुष्यात बऱ्याच गोष्टी मिळवतो, पण त्याही पेक्षा एक गोष्ट सदैव लक्षात ठेवायला हवी - मिळवलेली प्रत्येक गोष्ट पुन्हा मिळू शकते, पण एकदा चारित्र्य गमावलं की ती चादर पुन्हा नव्याने मिळवता येत नाही.
म्हणून सुरक्षित ठेव, निष्पाप ठेव, मैली होऊ देऊ नको, ए जिंदगी...! माणसाला मिळत नाहीत नव्या चादरी, स्वतःच्या स्वभावाच्या, चारित्र्याच्या...!!
#विद्यार्थीमित्र
Post a Comment