लग्न ठरविताना खालील बाबींचा अत्यंत गांभीर्याने विचार करा मित्रांनो...
* पत्रिका छापू नका.
* व्हॉट्स ॲप व मोबाईल वरून फक्त जवळच्या नातेवाईकांनाच आमंत्रण ध्या. वेळ व पैसा वाचेल.
* आहेर घेऊ नका मग आहेर परत देण्याचा प्रश्नच येणार नाही.
* मोजक्याच जवळच्या नातेवाईकांना लग्नासाठी बोलवा. आटोपशीर व व्यवस्थित लग्न पार पाडा.
* येणाऱ्या नातेवाईकांचे योग्य आदरातिथ्य व विचारपूस करा.
* व्याही व विहिनीशिवाय कुणाचाही सत्कार समारंभ ठेऊ नका.
* मेहंदी , संगीत ई खर्चिक कार्यक्रम करू नका.
* प्री वेडिंग व आफ्टर वेडिंग फोटोग्राफी करू नका.
* फोटो नेमकेच काढा.नंतर ते अल्बम व व्हिडिओ कोणी बघत नाही.
* कपड्यांवर जास्त खर्च करू नका.
* लग्नातील शालू,पैठण्या, लेहंगा, कोट नंतर धूळ खात पडतात.
* एक दिवसाच्या लग्नासाठी शेती विकून,कर्ज काढून आयुष्यभराचे कर्जबाजारी होऊ नका.
* पैसे खूपच जास्त झाले असतील तर मुलामुलींच्या नावावर मुदत ठेव करा.म्हणजे त्यांना भविष्यातील अडीअडचणीत उपयोगी येतील.
* मुलामुलींची लग्ने योग्य वयातच करा.
* लग्न वेळेवर लावा.
* लग्नात आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन करून गरिबांना अडचणीत आणू नका.
* लग्नाच्या पंगतीत पत्रावळीत उष्ट टाकू नका.(स्वतः विकत घेतलेलं आईस्क्रीम चाटून पुसून खाता)
* मागे झालेल्या चुका उगाळत बसू नका.आतातरी सुधारणा करा..
* गावागावातील लग्नास योग्य वधू वरानी,तरुणांनी व समाज बांधवांनी एकत्र येवून बैठका घेऊन अनिष्ट प्रथा मोडा. आपापल्या गावातून बदल घडवा.
* बदल आपणच करायचे असतात.लोक चार दिवस नावे ठेवतील तर ठेऊ द्यात.होळीची बोंब दोन दिवस.
*अशा पद्धतीने लग्न पार पाडणाऱ्याचा गावागावात व समाजाच्या मिटिग मध्ये सत्कार करा.समाजाच्या वॉट्स ॲप ग्रुपवर अभिनंदन व कौतुक करा..
सरकारी नोकरी लागली की 5 लाख कर्ज सोसायटी चे घेऊन लग्नात मित्राला 50 हजाराची दारू पाजून लग्न जोरात झालं किंवा केलं असं आयुष्य भर सांगण्यासाठी खोटा आव खोटी श्रीमंती दाखवणाऱ्या सर्वांना विनंती आहे..
मित्राला 50 हजाराची दारू पाजण्यापेक्षा आई बापाने व आजी आजोबानी तुला शिकवायचं म्हणून निर्धार धरून नोकरी ला लागण्या योग्य बनवलं म्हणून उपकार मानणासाठी प्रयत्न करा
मुलगा 7 लाखाला व मुलगी 7 लाखाला दोघे ही कर्जा च्या डोंगराखाली येताना दिसतात..
लग्नाला आई बाप यांचे नावाने कर्ज घेतात व लगेच नौकरी च्या गावी जाऊन ऐष अराम करतात व गावाला लक्ष देत नाहीत
म्हणून मुलगी व मुलाने लग्न हे साधं करावे व आलेल्या पाहुण्यांना आदर्श दिल्या सारखा दाखवायला पाहिजे जेवण मस्त चांगलं ठेवा
कर्जात मरू नका व आई बापाला पण मारू नका
मोठी लग्न मोठा दिखावा आहे..
वरील गोष्टींचा समाजाने ,समाज युवा कार्यकारिणीने व समाज कार्यकारिणीने अत्यंत गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.
बघा काही पटल्यास अनुकरण करावे नाहीतर आहेच येरे माझ्या मागल्या.......!!
* यावर मोठ्याप्रमाणात विचारमंथन होणे आवश्यक आहे.
* सगळ्यांनाच सगळे मुद्दे मान्य असतील असे नाही. कारण प्रतेक व्यक्ती तेवढी बुद्धी ..
Post a Comment