"ही सुट्टी म्हणजे एक सुवर्णसंधी आहे – स्वतःला ओळखण्याची, नवीन कौशल्ये आत्मसात करण्याची आणि उज्ज्वल भविष्य घडवण्याची.!"
बोर्ड परीक्षा हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. परीक्षेनंतर मिळणाऱ्या या सुट्ट्या जर योग्य प्रकारे वापरल्या, तर त्या भविष्यासाठी दिशादर्शक ठरू शकतात. मात्र, या कालावधीत केवळ विश्रांती घेणे पुरेसे नाही, तर आपल्या कल (aptitude), आवड (interest), आत्मविश्वास (confidence), तसेच कौटुंबिक आणि आर्थिक परिस्थिती यांचा विचार करून त्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.
"आज केलेली शहाणी गुंतवणूक उद्याच्या यशाचे बीज आहे, ही सुट्टी तुमच्या भविष्याचा पाया मजबूत करू शकते!"
दहावी आणि बारावीच्या परीक्षेनंतरच्या सुट्ट्या जरी मनोरंजन आणि विश्रांतीसाठी असल्या, तरी त्या तुमच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरू शकतात. त्यामुळे वेळ दवडण्याऐवजी स्वतःच्या क्षमता वाढवण्यासाठी आणि करिअर घडवण्यासाठी याचा उपयोग करा. कोणत्या क्षेत्रात पुढे जायचे आहे, कोणत्या कौशल्यांची जोड द्यायची आहे, याचा गांभीर्याने विचार करून पुढील टप्प्यांसाठी स्वतःला तयार करा.
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी या शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या वतीने #विद्यार्थी मित्र प्रा. रफीक शेख यांनी येणाऱ्या नवीन शिक्षण प्रणालीच्या दृष्टीने, तंत्रज्ञान क्रांतीचा विचार करून आणि बदलत्या युगाशी सुसंगत राहण्यासाठी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर केंद्रित मार्गदर्शिका तयार केली आहे.
ही मार्गदर्शिका पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी प्राधान्याने अवश्य वाचावी आणि आपल्या भविष्यासाठी योग्य दिशा निवडावी.*
ही सुवर्ण संधी हातातून जाऊ देऊ नका मित्रांनो, कारण आजचा एक योग्य निर्णय उद्याच्या यशाची गुरुकिल्ली ठरू शकतो !
मार्गदर्शशिका ऑनलाईन अभ्यासण्यासाठी, कृपया आपण सर्वांनी ह्या संकेत स्थळाला अवश्य भेट द्या..*👇
https://online.fliphtml5.com/ljwwl/eiuu/
आवडल्यास इतरांनीही अवश्य शेअर करा मित्रांनो..🙏
आपलाच स्नेही आणि मार्गदर्शक..
शैक्षणिक सल्लागार आणि समुपदेशक
#विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
https://www.vidhyarthimitra.com
Post a Comment