आपण आपल्या आयुष्यात किती आनंदी आहोत यापेक्षा आपल्यामुळे कितीजण आनंदी आहेत, हे आपल्यामध्ये असलेल्या क्षमतेवर विश्वास ठेवल्याने कार्य निश्चितच सफल होईल.
हाती घेतलेले प्रत्येक कार्य अशा पध्दतीने सफल होत असल्याने जीवनात कधीही उपेक्षा
वाट्याला न येता प्रत्येक क्षेत्रात तुमची गरज निर्माण होऊन तुमचे सगळीकडे स्वागतच होईल आणि हे
तेव्हाच साध्य होईल जेव्हा तुम्ही कुठलेही कार्य स्वतःच्या मनगटावर विश्वास ठेऊन व चिकाटीने कराल.
जीवनात संघर्ष व स्वतः च्या विचारातील परिवर्तनाशिवाय यशाला शॉर्टकट नसतो..
यशासाठी मार्गक्रमण करीत असताना नात्यानात्यांत अंतर न पडता एकमेकांशी संवाद साधणे आवश्यक असते व त्यामुळे आयुष्य जगणे सोपे होते.
जीवन जगत असताना अनेक वेळा मनुष्य नाऊमेद होऊ शकतो. अशा वेळी जिद्दीने तसेच त्याग व समर्पित
भावनेने कार्य केले असता निश्चितच मनाला उभारी मिळतेच मिळते.
याकामी मनुष्याला चांगले दोस्तहीसहकार्य करतात. दीर्घोद्योगी रहाण्यासाठी केवळ मनाची उभारी असणे कामाचे नाही तर त्यासाठी दीर्घायुषीही असावे व उत्तम स्वास्थ्यासाठी शिस्तबध्द व व्यसनमुक्त दिनक्रम असणे आवश्यक असते.
जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर तुमच्यापाशी गुणवत्ता, बुध्दिमत्ता, प्रेरणा, विश्वास व कामाप्रति श्रद्दा हे यशाचे दीपस्तंभ असणे अत्यंत गरजेचे असते.
यशोमार्गावर चालतांना परस्परांमध्ये आपलेपणा बरोबरंच प्रबळ इच्छाशक्ती, कृतिशीलता तसेच प्रत्येक गोष्टीचे महत्व लक्षात घेणे गरजेचे असते केवळ ईर्षेपोटी आपल्या अपयशासाठी सर्वजण उत्सुक असताना जिद्दीने यश मिळविण्यावर श्रध्दा असली म्हणजे यशाची शर्यत जिंकता येते.
जीवनाच्या वाटचालीत दिलेला शब्द पाळणे महत्वाचे असते.योग्य वयशस्वी लोकांच्या सहवासात असण्यानेच ते शक्य होते. निवडलेल्या मार्गावरुन चालतांना गैरसमजांना फाटा देऊन, स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व ठेऊन निर्धाराने निश्चित प्रेरणेने तसचे बुध्दिचातुर्यने व शक्ती आणि युक्तीने प्रयत् करीत राहिल्यास अंतिम विजय आपलाच असतो.
जीवनात वादळे आली तरंच आपले परके समजतात व संयमाने त्यांना परतवून लावता येते. कुठल्याही संधीकडे सकारात्मक दृष्टीने बधितल्यास मिळणारे परिणाम खूप चांगले असतात.व्यावहारिक वाटचाल करतांना प्रेमाची नाती जपणे फार महत्वाचे असते.
मार्गक्रमण करतांना हार जीत होतच असते. अशावेळी काचेसारखे तप्त होऊन तडकण्यापेक्षा हिऱ्यासारखे थंड रहाणे शहाणपणाचे असते. प्रयत्नांची पराकाष्ठा करतांना प्रसंगी तडजोड हाही यशाचाच भाग असू शकतो. तसेच योग्य समयसूचकता व लक्ष्यावरचे ध्यानही महत्वाचे आहे.
Post a Comment