“Traveling alone will be the scariest, most liberating, life changing experience of life. Try it at least once..!"
महाराष्ट्रात कोरोना महामारीचा प्रकोप असतांना अत्यंत कडक लॉकडाऊनात गेल्या एका आठवड्यापासून सध्या माझी एक Adventure Solo Trip दक्षिण भारतात चालू आहे..
विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेताना त्यावेळेच्या आंध्र प्रदेशातील बऱयाच मित्रांच्या स्नेह-पूर्वक ओळखीतुन चांगले पारिवारिक आणि जिवा-भावाचे मित्र आयुष्यात लाभलेत..
गेल्या काही वर्षांपासून त्या सर्वांनी वारंवार आमंत्रणे दिली पण शैक्षणिक-सामाजिक सेवेत व्यस्त असल्याने जाऊ शकलो नाही, पण कालच्या 20 तारखेला तो योग अगदी अचानक आला..
परभणीत कडक लॉकडाऊन असल्याने काही सुविधा उपलब्ध झाल्या नसताना, ना बस,ना ट्रेन, ना कार, ना कुठलं Ticket Reservation , माझ्या छोट्या बंधूनी त्याच्या Transport Connectivity चा योग्य वापर करीत मला हैदराबाद पर्यंत आणि तिथुन पुढे विजयवाडा,काकीनाडा विशाखापटनम पर्यंत प्रवासाची सर्व सोय उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्याचे मानावे तेवढे आभार कमीचं..!
ह्या प्रवासात मी खूप काही शिकलो काही जुने-नव्या मित्राच्या गोतावळ्यात इथं मी काही दिवस रमलो, दक्षिण भारतातील विशेषतः तेलंगाना आणि आंध्र-प्रदेशातील विजयवाडा आणि विशाखापटनम (Sea Coastal Area of Bay of Bengal) मधील नैसर्गिक सौंदर्य ,इथलं जन-जीवन, लोक-संचार, आचार-विचार, खान-पान, इथली व्यवस्था, त्यांची भाषिक अस्मिता, राजकारणी नेत्यांवर आणि अभिनेत्यावर प्रेम करणारे लोक, ह्यांची भौतिक प्रगती,येथील पर्यटन, सार्वजनिक वाहतुक व्यवस्था, स्वच्छ शहरे, NH वरील सुंदर व्यवस्थापन, पर्यावरण प्रेमी,ह्याचं लोकसाहित्य, अजूनही हे लोक Black & White काळातील जुने Telgu गाणे आजही आवडीनें ऐकतात हे विशेष बरं..खूप साऱ्या गोष्टी आहेत, ह्या सर्वांवर मी एक प्रवास-वर्णन ब्लॉग ही लिहणार आहे..
इथं कोणत्याही प्रकारचा लॉकडाऊन नाहीये,सगळं व्यवहार सुरळीतपणे चालू आहे अगदी शाळा , कॉलेज आणि क्लासेस सुद्धा पण पर्यटन स्थळें बंद आहे, माझी थोडी निराशा झाली.😢
सार्वजनिक ठिकाणी वावरताना सगळ्याना Mask मात्र Compulsory आहे बाबा अन्यथा Fine..!
तरी मी खूप ठिकाणी जाऊन आलो ,पण विशाखापटनमला जास्त वेळ थांबू शकलो नाही..
तिथून परत येताना काल रात्री माझ्या छोट्या भावाच्या एका मित्रानं त्याच्या गावी 'रेडिगुद्मम'ला ( विजयवाडा जिल्ह्यातील महिलावर्म मंडल) ह्या गावी त्यांच्या आमराईला भेट देण्याची विनंती केली..आणि मी लगेच तयार झालो...
त्यानं योग्य तो पाहुणचार करीत आज सकाळपासून त्याच्या आमराईत मनसोक्तपणे विहार करताना प्रत्येक प्रकारच्या आंब्याचा आस्वाद घेताना आनंद गगनात मावेना..
क्रमशः
लेख लवकरच पूर्ण करतो...
आपलाच..
-विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख..
एक संवेदनशील सह-प्रवासी..
डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
Post a Comment