प्रिय विद्यार्थी मित्रांनो;
विद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख सर लेखन-संपादित
विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन आणि समुपदेशन लेखमाला भाग-7 मध्ये आपलं हार्दिक स्वागत.. आणि हार्दिक आभार आपण देत असलेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल आणि स्नेहाबद्दल..
आजचा विषय:
करिअरसंबंधी निर्णय घेताना विद्यार्थ्यांची भूमिका काय हवी?
आपल्या करिअरबद्दल अगदी आजपासून विद्यार्थ्यांनी फार मोठा बागुलबुवा उभा करून जगण्यातला आनंद विस्कटू देऊ नये. करिअरसाठी प्रथम तुमचा कल, आवड नेमकी कोणत्या विषयात आहे ते तपासून पाहावे. करिअरचा निर्णय आई-वडिलांना विश्वासात घेऊन तुम्हीच घ्यायचा आहे. त्यासाठी विविध विषयातील माहिती आणि संधी मिळवायला सुरुवात करावी. जगात अगणित व्यवसाय आहेत आणि अनंत संधी आहेत.
तुमचे ध्येय फक्त डॉक्टर किंवा इंजिनीअर होणे, हे असता कामा नये. सर्वांनीच डॉक्टर किंवा इंजिनीअर होऊन चालणारही नाही.
तेव्हा चाकोरीबाहेरचे आणि तुम्हाला समाधान देणारे, आव्हानात्मक वाटणारे अभ्यासक्रम निवडले पाहिजे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कॉलेजमधील सुसज्ज ग्रंथालये, जिमखाना आणि विविध उपक्रमांचा उपयोग करून घ्यावा.
अभ्यासक्रमाची निवड करण्यापूर्वी पालक आणि विद्यार्थ्यांसाठी काय सूचना देता येतील..?
तुम्ही पालकांशी सगळ्या गोष्टी शेअर करायला शिकले पाहिजे. पालकांनीही विद्यार्थ्यांशी नियमित संवाद ठेवावा आणि अडचणींमध्ये त्यांना योग्य मार्गदर्शन करावे. ते त्यांच्या कामात, व्यवसायात कितीही व्यग्र असले तरी त्यांनी त्यांचा क्वालिटी टाइम दिलाच पाहिजे. विद्यार्थी करिअरचा चाकोरीबाहेर विचार करत असेल आणि तो योग्य असेल तर पालकांनी त्याला पाठिंबा आणि प्रोत्साहन द्यावे.
कॉलेजमध्ये प्रवेश घेताना विद्यार्थ्यांनी प्रामुख्याने कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात...?
मुख्य म्हणजे शाळेच्या युनिफॉर्ममधून आपली सुटका झाली आहे, याचा विद्यार्थ्यांना आनंद असतो. पण कॉलेजमध्ये येताना त्यांचे कपडे हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आरसा आहे. त्यामुळे शोभतील आणि चारचौघात स्वीकारले जातील असेच कपडे विद्यार्थ्यांनी घालावे. घरापासून लांबचा प्रवास करायला लागला तर, नको ते साहस करण्याच्या भानगडीत पडू नये.
नवी जागा, नवे मित्र, नव्या मैत्रिणी जमवताना तुमच्या आवडीनिवडींशी, आचार-विचारांशी मिळतेजुळते असलेल्यांशी केलेली मैत्री दीर्घजीवी असू शकेल. कॉलेजमध्ये वैयक्तिक अडचणी किंवा गंभीर समस्या कशा सोडवायच्या, यासाठी मार्गदर्शन करणारे कौन्सिलर असतात. त्यांची मदत तुम्ही घेऊ शकता किंवा शिक्षकांशी संवाद साधू शकता.
कॉलेजमधील शिस्तीसंबंधी महत्त्वाचे मुद्दे कोणते..?
कॉलेजमधील शिस्त ही तुमच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आखलेली असते. तेव्हा आयकार्ड घालणे, मोबाइलचा वापर मर्यादित क्षेत्रात करणे हे कटाक्षाने पाळणे अपेक्षित असते. अलीकडे आपण रॅगिंगच्या बातम्या वाचतो आणि हादरून जातो. कॉलेजच्या आवारात अशा घटना घडणार नाहीत. पण आवाराबाहेर विद्यार्थ्यांना स्वतःची काळजी घ्यावी लागेल.
समाजघातक व्यक्तींच्या संगतीत आपण येणार नाही, याची खबरदारी घ्यावी.
ह्या आणि अशा साऱ्या प्रश्नांवर आपल्याला एकच उत्तर ...!
करिअर मार्गदर्शन समुपदेशन लेखमालिकेत ..!
आणि आपणास पडलेल्या करिअर संबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचं आम्हीं नक्कीच प्रयत्न करू मित्रांनो..
आपणा सर्वांना पुढील वाटचालीस आपणास हार्दिक शुभेच्छा सह सदिच्छा मित्रांनो...
आपली हाक आणि आमची साथ..
नेहमीच आपल्या सेवेत सदैव तत्पर...!
लेख संकलन, लेखन आणि संपादन..
🎓अधिक माहितीसाठी संपर्क:
विद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख,
9822624178 / 9970717187
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
Post a Comment