दिल से मांगी जाए तो,
हर दुआ में असर होता है,
मंजिलें उन्हीं को मिलती हैं,
जिनकी जिंदगी में सफ़र होता है।
आयुष्याच्या जीवन प्रवासात सह प्रवास हा नेहमीच एक सुखद अनुभव देतो, त्याशिवाय नवंनिर्मितीची आस आणि प्रेरणादायी आनंदासह उत्साह कुठून आयात करणार..!
प्रत्येक सह-प्रवास माणसाला नेहमीच काहीतरी देतोचं.. फक्त तो संवेदनशील आणि जागृत असणं गरजेचं..
नवं-स्थान भेटीगाठी आणि भेटणारी माणसचं आपल्या व्यक्तित्वाला आकार देऊन स्व:कर्तृत्व सिद्ध करून नेतृत्व करण्यास सक्षम बनवतं..!
श्वासाच्या अखेरपर्यंत न संपणारा जीवनाचा प्रवास अनेक नागमोडी वळणावर विवीध आव्हानं आणि परीक्षा घेत आपल्या क्षमता आणि कर्तृत्वाची स्वयं-सिध्दता निश्चित करतं..
पण हा सह-प्रवास स्वयं-कर्तृत्वातून नेतृत्व प्रदान करतं..!
आयुष्य नावाच्या प्रवासांत सह-प्रवास असावं ,तो जगणं समृद्ध करीत आयुष्याला अर्थ देतो..
एक संवेदनशील सह-प्रवाशी..!
-विद्यार्थी मित्र प्रा. रफीक शेख, परभणी..
डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
Post a Comment