देशातली सगळी सत्ता एकाच राज्यकर्त्याच्या हातात...
फक्त त्याचंच नाव बातम्यांत.
तो असं म्हणाला...
तो तसं म्हणाला…
त्याचा फक्त त्याच्या साथीदारावरच विश्वास...
न्याययंत्रणा त्याच्या मुठीत.
पोलीस त्याच्या आज्ञेत.
त्यानं संपावर बंदी घातली …
त्यानं विरोधकांवर बंदी घातली...
त्याचे दोन भांडवलदार मित्र.....
ते त्याला आणि त्याच्या पक्षाला देणग्या देतात .
देशातली सगळी शेती
सगळे कारखाने , सगळे उद्योग
या दोन उद्योगपतींच्या हातात .
विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांवर गोळीबार ,
शिक्षकांना विनाचौकशी तुरुंगवास,
शेतमाल विकणाऱ्या शेतकऱ्यांना अटका,
संपावरच्या कामगारांचे हातपाय मोडणं....
याबद्दल प्रश्न विचारतो एक स्वातंत्र्यसैनिक......
त्याचं नाव मातीगारी...!
तो काय करतो ?
त्याचं काय होतं ?
सत्य आणि न्यायाचा त्याचा शोध कुठं संपतो ? ??
' मातीगारी' कादंबरी हे असं बरच काही सांगते.
कादंबरी आपल्या भारताबद्दल सांगते असं वाटलं तर तो काल्पनिक योगायोग मुळीच समजू नका ...!
या पुस्तकानं जनतेच्या मनातली दहशत पुसून इतका आत्मविश्वास जागवला की पोलिसांनी घराघरात घुसून हे पुस्तकं शोधून नष्ट केलं..!
न्गुगी वा थ्योंगो या केनियन लेखकाच्या साहित्याला नोबेल पुरस्कार मिळेल अशी जागतिक साहित्यविश्वात गंभीर चर्चा आहे.
त्याच्या मातीगारी या पुस्तकाचा नितीन साळूखे यांनी केलेला मराठी अनुवाद ...
प्रकाशक - मैत्री प्रकाशन
सवलत मुल्य - 200/-
संपर्क: मोहिनी- 9284617081 , दयानंद-9657240824 , अरिफ- 8329811050
Post a Comment