" क्रांती काही सफरचंद नव्हे ,
जो पिकल्यावर पडेल,
तुम्हाला क्रांती घडवावीच लागेल."
जगभरातल्या क्रांतिकारकांचा आदर्श अर्नेस्टो गव्हेरा अर्थात ‘चे’ गव्हेराचा आज जन्मदिवस. १४ जून १९२८ रोजी अर्जेंटिना येथील रोझारीया येथे ‘चे’ गव्हेराचा जन्म झाला. ९ ऑक्टोबर १९६७ रोजी अमेरिकेने बॉलिव्हियन आर्मी च्या मदतीने ‘चे’ची हत्या केली. या घटनेला ५४ वर्षे होत आली. तरीही आजही चे गव्हेरा जगभरातल्या तरुणांचा, क्रांतिकारकांचा आदर्श आहे. आजही जगभरातील क्रांतिकारकांचा सर्वात लोकप्रिय नेता ‘चे’च आहे.
‘चे’ गव्हेरा क्रांतिकारक तर होतात पण त्याने वैद्यकीय शिक्षण (डॉक्टर) पूर्ण केले होते, तो विचारवंत, लेखक होता वैद्यकीय शिक्षणाच्या शेवटच्या वर्षाला असताना वयाच्या तेविसाव्या वर्षी वर्षी ‘चे’ गव्हेराने आपल्या एका डॉक्टर मित्राबरोबर संपूर्ण लॅटिन अमेरिकन ( दक्षिण अमेरिका ) देशांचा मोटारसायकलवरून दौरा केला. त्यांना या दौऱ्यात लॅटिन अमेरिकन देशातील गरिबी, भूक, तेथील खाण कामगारांचे भांडवलदारांना कडून होणारे शोषण, कुष्ठरोग्यांच्या वसाहती दिसल्या, साम्राज्यशाही, हुकूमशहांकडून होणारे शोषण त्यांनी पाहिले.
त्यामुळे अर्थातच ‘चे’चा कल समाजवादाकडे व सशस्त्र क्रांतीच्या विचाराकडे वाढला. भांडवलदारी व साम्राज्यशाही व्यवसस्थेचे वर्चस्व संपवण्याचा निर्धार ‘चे’ने केला. खाण कामगार, कुष्ठरोगी यांच्यासाठी काम करायला सुरुवात केली. पेरू देशातील हिलदा गेडिया यांच्यामुळे ‘चे’ची मार्क्सवादाशी ओळख झाली.
वैदयकीय शिक्षण संपल्यावर ‘चे’ हिलदा गेडिया बरोबर ग्वातेमला येथील सरकारमध्ये हस्तक्षेप करत असलेल्या अमेरिकी कंपन्यांविरुद्ध संघर्ष करण्यासाठी व तेथील सुधारणावाद्यांना मदत करण्यासाठी ग्वातेमला येथे गेले.येथील रस्त्यावर उतरून त्यांनी संघर्ष केला.
या संघर्षानंतर हिलदा व ‘चे’ मेक्सिको येथे गेले. तिथे त्याची ओळख फिडेल कॅस्ट्रो व राउल कॅस्ट्रो या बंधूंबरोबर झाली. कॅस्ट्रो बंधू क्युबामधील अमेरिका समर्थित हुकूमशहा फुलजोसीओ बतिस्ता यांच्या विरोधात लढण्याच्या तयारीत होते. ‘चे’ने ही कॅस्ट्रो बंधूंच्या लढाईत उतरण्याचे ठरवले.
मेक्सिको वरून कॅस्ट्रो बंधूं, ‘चे’ व इतर ८९ क्रांतीकारक क्युबामध्ये पोहचले. परंतु तिथे पोचल्याबरोबर ७० क्रांतीकारकांना हुकूमशाही सरकारकडून मारण्यात आले. वाचलेल्या ‘चे’ गव्हेरा, कॅस्ट्रो बंधू व इतर क्रांतिकारकांनी क्युबा मध्ये क्रांती घडवून आणली.
अमेरिकेचे समर्थन असलेले हुकुमशहा बतिस्ताचे सरकार उलथवून लावले. कॅस्ट्रो बंधूं बरोबरच १९५९च्या क्युबन क्रांतीमध्ये ‘चे’ गव्हेराचाही महत्त्वाचा वाटा होता. ‘चे’ सुद्धा १९५९ च्या क्यूबन क्रांती चा नायक होता. परंतु क्रांती नंतर त्यांच्या हाती बतीस्ताने पूर्णपणे लुटलेला क्युबा मिळाला.
क्युबाची आर्थिक स्थिती अतिशय वाईट होती. क्यूबाची आर्थिक स्थिती सुधारायची तर होतीच पण जगात क्युबाल देश म्हणून मान्यता मिळवायची होती. अर्थातच त्याची जबाबदारी फिडेल कॅस्ट्रोने ‘चे’ कडे दिली. ‘चे’ गव्हेराला अर्थ मंत्रालय व क्युबाच्या राष्ट्रीय बँकेची जबाबदारी दिली. त्या वेळी ‘चे’चे वय होते केवळ ३१ वर्षे.
अमेरिकेने (यु. एस. ए.) क्युबावर आर्थिक निर्बंध घातले होते. पण ‘चे’ आणि कॅस्ट्रो यांनी क्युबाला समाजवादाचे मॉडेल बनवण्याचा निर्धार केला होता.
‘चे’चे स्वप्न होते क्युबाच्या लोकांना स्वार्थ, लोभ, एकमेकांना प्रतिस्पर्धेपासून दूर ठेवायचे. ती जबाबदारी ‘चे’ने उत्तम रीतीने पार पाडली पार पाडली. ‘चे’ स्वतः डॉक्टर असल्यामुळेच क्युबामध्ये उत्तम अशी आरोग्य व्यवस्था निर्माण केली गेली.
आज ही क्युबाची आरोग्यव्यवस्था जगातील उत्तम आरोग्यव्यवस्थेत गणली जाते. क्युबामध्ये एक हजार लोकसंख्येमागे जगातील सर्वाधिक म्हणजे ७.५२ डॉक्टर्स आहेत. ड्राहजारी लोकसंख्येमागे अमेरिकेत तीन तर भारतामध्ये ०.७० डॉक्टर्स आहेत.
आज कोरोना महामारीच्या काळात क्युबाचे डॉक्टर्स जगभरातल्या अनेक देशांमध्ये जाऊन प्रत्यक्षपणे मदत करत आहेत. यावरून क्युबाच्या आरोग्यव्यवस्थेची कल्पना येते. याचं श्रेय ‘चे’ला द्यावेच लागेल.
क्युबा समाजवादाचा केवळ ‘शो पीस’ नसेल तर समाजवादाचे जिवंत उदाहरण असेल, क्युबा गरीब आहे पण जगाला प्रेम देईल, प्रेम हेच समाजवाडाचे प्रमुख सूत्र आहे असे ‘चे’ म्हणत असे. ‘चे’ स्वतः आणि ‘चे’च्या प्रभावामुळे क्युबा अमेरिकेसारख्या बलाढ्य शक्तींशी लढले. ..
अर्नेस्टो गव्हेराच्या या कामगिरी मुळेच क्युबन जनतेने अर्नेस्टो गव्हेराला कायमचे ‘चे’ गव्हेरा केले. ‘चे’ म्हणजे मित्र. ‘चे’ सर्वांचा मित्रच होता. जगभरातल्या शोषितांचा, अन्यायग्रस्तांचा, दबलेल्या, पिचलेल्यांचा मित्र. क्युबाचा प्रतिनिधी म्हणून ‘चे’ने संयुक्त राष्ट्र संघामध्ये अमेरिकेच्या धोरणांविरुद्ध, साम्राज्यवादा विरुद्ध आवाज उठवला.
जगभरामध्ये साम्राज्यवाद, अन्याय, शोषण या विरुद्ध विरुद्ध क्रांती झाली पाहिजे असे ‘चे’ मानत असे व त्यासाठी प्रत्यक्ष कृती करत असे. त्यासाठीच ‘चे’ने क्यूबाचे मंत्रिपद सोडले व आफ्रिकेतील कांगो देशातल्या क्रांतिकारकांना मदत करण्यासाठी ‘चे’ तिथे पोहोचला.
परंतु तिथे फारसे यश मिळू शकले मिळू शकले शकले नाही.
त्यानंतर ‘चे’ बोलिव्हीयातील अमेरिकी वर्चस्वाखालील हुकूमशाही शासनाविरुद्ध लढण्यासाठी बॉलिव्हियामध्ये पोहचला. बोलिव्हीया मध्ये ‘चे’ने सशस्त्र गोरिला तुकड्या बनवल्याआणि तो तिथल्या हुकूमशहा विरुद्ध लढू लागला. अर्थात तोपर्यंत ‘चे’ अमेरिकेचा एक नंबरचा शत्रू बनला होता.
अमेरिकन कंपन्यां कडून गरीब राष्ट्रातील लोकांचे होणारे शोषण आणि अमेरिकन सरकारची दादागिरी याविरुद्ध लढणाऱ्या ‘चे’ला अमेरिकेला संपवायचेच होते. त्यामुळे अमेरिकेच्या इशाऱ्यावरून बोलिव्हीयन सैन्याने ‘चे’च्या नेतृत्वाखालील गोरिला तुकडीला पकडले. अर्थातच ‘चे’ही पकडला गेला.
‘चे’च्या हत्येचे आदेश दिले गेले. ‘चे’ची हत्या करण्याची जबाबदारी मारिया तेरान नावाच्या सैनिकावर सोपवण्यात आली. ‘चे’ला बॉलिव्हियातील ‘ला हिगुएरा’ नावाच्या गावातील एका शाळेत नेले. ‘चे’ची हत्या करायला गेलेला तो सैनिक थरथरत होता.
त्यावेळी त्या सैनिकाला ‘चे’ म्हणाला, ‘शांत हो आणि आणि बरोबर नेम धर, तू एका मनुष्याला मारत आहेस, विचारांना नाही आहेस’.
असा हा मृत्यूलाही न घाबरणारा किंबहुना मृत्यूचा थरकाप उडवणारा क्रांतिकारी होता होता. जो जगात शोषण विरहित,समतावादी, भूकमुक्त व भयमुक्त, गरिबी विरहित समाज निर्माण व्हावा म्हणून वयाच्या केवळ ३९ व्या वर्षी मृत्युला सामोरा गेला अशा या महान क्रांतिकरकास माझे शतशः अभिवादन..!
Post a Comment