हवेतला गारवा...!
मन अगदी प्रफुल्लित करतं.. आयुष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करतं...
आजची शुभ सकाळ..संपूर्ण दिवस प्रसन्न करेल ह्यात शंकाच नाही..
संघर्षरत आयुष्यात जगणं विसरतोय का.? हा प्रश्न कधीं कधी स्वतःलाच विचारुन गोंधळून जातो..कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदाऱ्या पेलताना स्वतःला कधी कधी विसरतोय असं वाटतंय..
श्वास घेण्याईतकी जागा नसणाऱ्या ह्या स्पर्धेच्या जगात गुदमरणार नाही हा आत्मविश्वास मात्र अस्संल अंगी बाळगणाऱ्याना स्वतःच्या कर्तुत्वावर विश्वास नक्कीच असतो मित्रांनो..
ऋतुमानाप्रमाणे बदल हवाच..! नैसर्गिक अनुकूलताचं प्रतिकूल परिस्थितीत जगणं समृद्ध करते..
डिसेंबर-जानेवारीचा गारवा खुप सार ऊब देणार असतं त्यातली ऋतुमानानुसार ऊर्जा घेतली तर आयुष्यात खूप सारं काही रचनात्मक करता येतं असं मला वाटतं..
©विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख..
The Spirit of Zindagi..
https://www.facebook.com/thespiritofzindagi
Post a Comment