गेल्या आठवड्यात 5 सप्टेंबर 2021 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात एका महत्वाच्या कामानिमित्तानं जाणं झालं, सकाळ सत्रात एक कार्यक्रम होता,पण 9:30 ची मराठवाडा एक्सप्रेस ( High-Court Train) सव्वा तासानं उशिरा पोहचल्यानं कार्यक्रमात हजेरी देऊ शकलो नाही..कोणताही शैक्षणिक-सामाजिक कार्यक्रम न करता परत येणं हे दुर्भाग्य अद्यापही लाभलं नाही ह्याबद्दल नेहमीच समाधान व्यक्त करतो..
येतांना विद्यपीठ परिसराच्या मागील बाजूस बेगमपुरा भागांत माझ्या एका गुणी माजी विद्यार्थी मनोज जाधव याने स्पर्धा परीक्षा क्षेत्रात आपलं नशीब आजमावत आपलं कर्तृत्व सिद्ध करीत 'The Excellence Career Academy' गेल्या काही वर्षांपासून सुरू केल्याचं मागेच कळलं होतं, अनेकवेळा विद्यपीठात संशोधनाच्या अभ्यास-मार्गदर्शनाच्या निमित्ताने त्याच परिसरातुन येणं-जाणं झालं पण प्रत्यक्षात भेटीचा योग आला नाही..
तो योग पूर्वनियोजित असेलही कदाचित, मी ट्रेनमध्ये असतांनाच मनोजशी संपर्क साधला आणि लगेच त्यानं माझं यथोचित सत्कार आणि त्याच्या विद्यार्थ्यांना शिक्षक-दिनाच्या निमित्ताने मार्गदर्शन करण्याची संधी हेच मला आजच्या शिक्षक दिनाचं औचित्य साधत आमची भेट निश्चित झाली..
नेहमीप्रमाणे फरमान शेख ( औरंगाबाद येथे स्थायिक असलेला माझा खास जिवलग आणि दिलदार मित्र) स्टेशनवर आला आणि तिथून लगेच विद्यपीठात... पण उशीर झाला आणि नियोजित कार्यक्रमास मुकलो..!
डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाऊंडेशन मित्र परिवारातील एक गुणी विद्यार्थ्यांनी ह्याच विद्यपीठात वनस्पती-जीवशास्त्रात संशोधन कार्य करणारी रोहिणी श्याम पुंडगे भेटली.. तीला तर चक्क धक्काच..! शिक्षक दिनाच्या निमित्ताने खूप साऱ्या विद्यार्थ्यांना भेटलो..त्यांच्या सोबत केलेल्या गप्पा गोष्टींतुन आजही त्यांचा संघर्ष जाणवतं होतं..पण आनंदही होत होता..
आयुष्यातील विविध आव्हानांना तोंड देत आपली सक्षमता सिद्ध करीत आपल्या पुरती मर्यादीत न ठेवता त्याचा वापर समाजासाठी आणि समाजहितासाठी कसं करावं हेही तिथल्या विद्यार्थ्यांना समजून सांगत होतो...
विद्यपीठं परिसरात आजही अनेक ग्रामीण भागातील विद्यार्थी परंपरागत अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपलं भविष्य साकार करण्यासाठी आपली प्रमाणिक धडपड करतांना दिसले आणि त्या सर्वांमध्ये मी ही माझा महाविद्यालयिन काळातील भूतकाळाचं प्रतिबिंब पाहून थक्क होत होतो..
त्या सर्वांशी धावती भेट घेत मनोज जाधवच्या अकॅडमीवर गेलो, त्यानं यथोचित आदरातिथ्य आणि सन्मान करीत तिथला परिसर , विद्यार्थी वसतिगृह , त्याचं नियोजन,अभ्यासिका,खानावळ, क्लासरूम , सुसज्ज ऑफिस आदि सर्वं बाबी दाखविताना परभणी ते औरंगाबाद ह्या संघर्षाचा प्रवास वर्णन करीत आपला उत्साह, आत्मविश्वास आणि अकॅडमीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रती असलेली आपली कटिबद्धता आणि त्यांना घडविण्याची प्रामाणिक तळमळ हे सर्व मी अनुभवत होतो..
राज्यसेवा संयुक्त परीक्षेचा पेपर आटोपून ह्या विद्यार्थ्यांच्या सर्वं सोयी सुविधा आणि माझ्या मार्गदर्शन कार्यक्रमाची त्याची धडपड मला खूप काही शिकून गेली,आपल्या कर्तव्याप्रती असलेला संवेदनशील प्रतिसाद मला माझ्या संघर्षाची आठवण करून देत होता.. त्यांनं दिलेला यथोचित सन्मान माझ्या कायम स्मृतित कोरला गेला..माझा एक गुणी विद्यार्थी माझ्याचं पाऊलावर पाऊल टाकीत आपल्या संघर्षातुन स्वतःला सिद्ध करतोय ही बाब मला सुखावणारी आणि गौरवांकीत करणारी पर्वणी ठरली..
होणाऱ्या आगामी पोलीस भरतीच्या पूर्वतयारीला खान्देश, विदर्भ आणि मराठवाड्याच्या काना-कोपऱ्यातुन 100 पेक्षा जास्त विद्यार्थी सध्या त्याच्या अकॅडमी वसतिगृहात आणि कोचिंग सेंटर मध्ये शिकत आहेत त्या सर्वांशी ' स्पर्धा परीक्षा करिअर आणि आव्हानं- स्वयं-सिद्धतेतून नेतृत्व' ह्या विषयांवर एक मार्गदर्शन कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधताना त्यांच्या खूप साऱ्या प्रश्नांना मी साद घालत त्यांना मार्गदर्शन केलं..
त्यांचाकडून आलेला धिर-गंभीर प्रतिसाद आणि मनसोक्त गप्पा त्यांच्या अभ्यासकार्याला दिशा देऊन गेला हे त्यांच्या विविध माध्यमातून आलेल्या प्रतिसादावरून लक्षात आलं..
आजही शहरी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या करिअरला उत्तम दिशा आणि मार्गदर्शन गरजेचं आहे त्याशिवाय त्यांच्या ध्येय अस्तित्वाच्या संघर्षाला अर्थ असणार..
आजच्या तरुणांकडे खूप सारे Resources आहेत पण त्यांतील नेमकी दिशा जी आपल्या स्वप्नांना ध्येयाप्रती निश्चितपणे नेईल असा राजमार्ग विकसित करण्यासाठी मित्र, मार्गदर्शक, पालक ,शिक्षक आणि ईतर घटकांनीही पुढाकार घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं..
खूप साऱ्या गोष्टी ह्यानिमित्ताने व्यक्त कराव्या असं वाटलं, पुन्हा एका नव्या विषयावर ह्यासंबंधी मी अवश्य लेखन करेल..
मनोज जाधव (सर) हा स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपलं नशीब आजमावत विद्यार्थ्यांना ज्या जिद्दीने घडवीत आहे त्या अथक प्रयत्नांना सलाम आणि अभिमान..
आपल्या कार्यास सदैव शुभेच्छा आणि सदिच्छा..
आपलाच स्नेहाकिंत शुभेच्छुक:
विद्यार्थी मित्र प्रा. रफीक शेख, परभणी..
डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
Post a Comment