युक्रेनची लोकसंख्या सुमारे साडेचार कोटी. भारतातील अनेक राज्ये यापेक्षा मोठी आहेत.
तरीही भारतातील हजारो विद्यार्थी तेथे वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी जातात. कारण तेथे आपल्यापेक्षा शिक्षण स्वस्त आहे.
एकीकडे आपण जागतिक महासत्ता होण्याच्या गोष्टी करतो, आत्मनिर्भर होत आहोत म्हणतो आणि दुसरीकडे शिक्षणासाठी आपल्याहून किती तरी लहान असलेल्या देशात आपल्या विद्यार्थ्यांना जावे लागते. विचार करायला लावणारी गोष्ट आहे. आपल्याकडे बहुतांश शिक्षण संस्था राजकीय पुढाऱ्यांच्या आहेत. मतासाठी विविध आश्वासने देणारे, कधी बुद्धिभेद करून मते मिळविणारे हे पुढारी सर्वांना परवडेल असे शिक्षण देऊ शकत नाहीत का?
आपण नागरिकही त्यांच्याकडून अशी अपेक्षा का करू नये? आशा मूलभूत मुद्द्याकडे दुर्लक्ष व्हावे म्हणून तर इतर भावनिक मुद्दे उपस्थित करून त्यात जनतेला व्यस्त ठेवले जात नसेल ना? यासंबधी सरकारी धोरणे बदलण्याची गरज आहे का? त्यावर व्यापक चर्चा का होत नाही?
कॉलेजमध्ये हिजाब घालावा की स्कार्फ, या पेक्षा त्या कॉलेजची फी किती आहे? हे कधी विचारले जाणार? बाहेर जाणार हा पैसा देशातच नाही का थाबंदविता येणार..?
युक्रेन - रशिया वादात जग भारताकडे आशेने पहात आहे, ही अभिमानाची गोष्ट नक्कीच आहे. पण सोबतच आपल्याला शिक्षणासारख्या गोष्टीसाठी आशा छोटया देशावर अवलंबून रहावे लागते, हेही विचार करायला लावणारे आहे.
Post a Comment