🎓 आदरणीय आणि स्नेही गुरुजन मित्रांनो..!
समर्पित सेवा वृत्तीनं कोचिंग व्यवसायिक सेवा क्षेत्रात गेल्या 20 वर्षांपेक्षा अधिक कालावधीत विद्यार्थ्यांच्या सेवेत अगदी प्रामाणिकपणे कठोर परिश्रम घेत , आपल्या सामाजिक बांधिलकीनं शैक्षणिक-सामाजिक सेवा क्षेत्रात आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आपलं कार्य कर्तृत्व सिद्ध करत कोचिंग क्लासेस विश्वात आपलं वेगळं स्थान निर्माण करत एक नवा आदर्श प्रस्थापित केलं असून येणाऱ्या काळात आपणां सर्वांच्या समोर आपलं व्यवसायिक अस्तित्व टिकवण्याचा संघर्ष सर्वांना मिळुन सोबत करावयाचा आहे..
नुकताच काल आपलं शैक्षणीक वर्षं 2021-22 च्या अध्यापन कार्याचा अंतिम तासिका झाली.. काल आपणां सर्वांना सोबत ह्या संदर्भात चर्चा ही करणार होतो पण कालचा दिवस पुढच्या भावी चिंतेनं थोडंस अस्वस्थ असल्यानें आपणां सर्वांशी चर्चा करू शकलो नाही ह्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो..🥴
अद्यापर्यंत आपणां सर्वांचं अनमोल सहकार्य आणि साथ हिच आपल्या परिवाराची खरी ताकत आहे.. ह्याचा मला सार्थ अभिमान आहे मित्रांनो...🤝🏻
ज्या ठिकाणी ,ज्या परिस्थितीत आपण जिथं क्लासेस घेतोय तिथं खऱ्या अर्थाने आपण आपली सामाजिक बांधिलकी जपत इथल्या विद्यार्थ्यांप्रती असलेलं आपलं स्नेह-प्रेम , शिकवणी सोबत मिळणाऱ्या मानसिक समाधानातून जे विद्यार्थी आपण घडवीत आहोत हीच आपल्या आयुष्याची खरी कमाई आहे मित्रांनो..🤝🏻
कोणत्याही अति भौतिक सुख आणि एषोरामाची आशा न करता ज्यानं हा व्यवसाय पूर्णपणे समर्पित सेवा वृत्तीनं स्वीकारून ह्यासाठी आपलं आयुष्य वेचलं अश्या खऱ्या हाडाच्या शिक्षकाचं कर्तृत्व येणाऱ्या काळात एक स्वयं-सिद्ध नेतृत्वात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही हे ही अगदी खरंय मित्रांनो.. आणि तो कधीच एकटा पळणार नाही ..इतरांनाही सोबत घेऊनचं पुढं जाईल..👍🏻
शैक्षणिक वर्षांतील मार्च, एप्रिल आणि मे हे तीन महिन्यांत कोणत्याही प्रकारच्या बॅचेस नसल्यानं फिसची आवक बंद असते, आपल्या समोर आर्थिक परिस्थितीचं गंभीर संकट असल्यानं आपली चिडचिड मनस्थिती आपल्याला नकारार्थी ऊर्जा देते ज्यानं अनेक संभाव्य धोके निर्माण होण्याची शक्यता जास्त असल्यानं आपण शांत आणि संयमी , अभ्यासू वृत्तीनं आपला आत्मविश्वास दृढ करीत योग्य आर्थिक पूर्व नियोजन करून ह्यावर आपण सहज मात करू शकतो असं मला वाटतं..👍🏻
संकट काळात स्वतःवर विश्वास असणारा , सकारात्मक विचार आणि रचनात्मक कृती करणारा,प्रतिकूल परिस्थितीला शरण न जाता विषम परिस्थितीत अनुकूलता साधत त्यांत आपल्या संयमानं उद्याच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्नं सत्यात उतरविण्यासाठी वर्तमान स्थितीला पूरक मानून स्वयं-सिद्ध आचरणानं इतरांनाही प्रेरित करणारा आपल्या सारख्या समर्पित शिक्षकाला हा काळ खऱ्या अर्थाने अधिक समृद्ध आणि संपन्न करू शकतो असा विश्वास मी बाळगतो..🤝🏻
संपन्न झालेल्या शैक्षणिक वर्षात आपण सर्वांनी प्रचंड मेहनत घेतली आहे... ह्याचं करावं तेवढं कौतुक कमीचं मित्रांनो..!🌹
कळत-न कळत , प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे व्यवस्थापणात काही त्रुटी कींवा कमतरतेमुळे आपल्या मासिक वेतनात एक - दोन दिवस मागे पुढं झालं असेल त्याबद्दल खंत ही व्यक्त करू इच्छितो.. परंतु मार्च-एप्रिल महिन्यात पालकांकडुन फिसचा भरणा वेळेत होतं नसल्याचा अनुभव नित्याचा असल्यानं ह्या वेळेत थोडा उशीर होईल पण आपलं वेतन कधीच थकणार नाही ह्याची काळजीही आम्हीं सदैव घेतचं असतो.. पण मागील कोरोना काळातील अनुभव हा कष्ट प्रद असल्यानं मला ह्याचं मानसिक त्रास खूप झाला..🥴
ऐन कोरोना काळात ( पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत) परीक्षा रद्द झाल्यानं सगळ्याच्यां बॅचेस कोसळल्या,पालकांनीही फिस दिली नसल्यानं क्लासेसचं आर्थिक नियोजन बिघडल्यानं खूप साऱ्या समस्या निर्माण झाल्याने त्याचा नाहक भ्रूदंड आजही आम्ही भोगतोय..जणू आपल्या हक्काचे पैसे खाऊन आम्हीं दोन मजले बांधले आहेत..🥴
हा काळ आपणां सर्वांसाठी विपरीत होता पण आपण थांबलो नाही, काळाची पावलं योग्य वेळी ओळखुन आपण सर्वजण सामंजस्य एक दिलानं प्रवाही होतं व्यापक होतोय ह्याचा वेगळा आनंद आपणां सर्वांना नक्कीच असेल.. येणाऱ्या भावी काळात आपल्याला खुप साऱ्या नव्या गोष्टीं,नवं-तंत्रज्ञान शिकत , कालानुरूप आपल्या व्यवसायात होणारे बदल ही त्याच ताकतीनं स्वीकारत नव्या शिक्षण प्रणालीची कास धरत आपलं अर्थाजन करत सामाजिक बांधिलकी जपुन एक नवी सुरुवात करूया..🤝🏻
ई. स. 1998 साली सुरु झालेलं SK Coaching Classes ने आपली कात टाकत नव्या सामाजिक गरजेप्रमाणे आपलं नवं रूप स्वीकारून सन 2015 साली डॉ. ए. पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन ह्या शैक्षणिक-सामाजिक सेवा क्षेत्रात आपलं दालन प्रस्थापित करत इतरांनाही प्रेरित केलं आहे..
ह्या सर्वांचे आपण साक्षीदार आणि साथीदारही राहिले आहेत ह्याचा द्विगणीत आनंद आपणां सर्वांना आहे..😊
आपलं प्रेम स्नेह-सहकार्य असचं सदैव राहू द्या, कुठं चुकत असेल तर त्याची पूर्वकल्पना अवश्य द्या मित्रांनो..
आजच्या या जीवघेण्या स्पर्धेच्या युगात श्वास घेण्याइतकी जागा नसतांना मित्रांनो , स्पर्धे-ऐवजीं सहकार्य ,सहप्रयोग, सह-अनुभुती, सह-निर्मिती, समस्यापुर्तीतुन प्रमाणिकता ठेऊन एकजुटीने आणि एक दिलाने आपल्या व्यावसायिक क्षेत्रातील दिवसागणिक येणाऱ्या अनेक नव्या अडचणी वर मात करून आपलं अस्तित्व टिकवूया असं मला वाटतं.
ह्या शैक्षणिक परिवाराची आपणचं खरी संपत्ती आहे..ह्याची जाणीव असू द्या गुरुजन मित्रांनो..
कुठं चुकलं असेल तर अवश्य क्षमा असावी..🙏🏻
धन्यवाद..🤝🏻
🎓आपलाच विनम्र स्नेही🙏🏻
विद्यार्थी मित्र प्रा. रफीक शेख..
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
Post a Comment