शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय कार्य क्षेत्रात प्रबोधनात्मक चळवळीत कार्य करणारे आमचे स्नेही मित्र कॉम्रेड नसीर शेख ( जिल्हा अध्यक्ष DYFI ,परभणी.) यांच्या 'जयभीम' ह्या चित्रपटावरील लेख DYFI च्या 'युवासंघर्ष'मुखपत्राच्या फेब्रुवारी 2022 च्या अंकात अग्रस्थान मिळाल्याचं कळलं.. कॉम्रेड नसीर शेख ह्यांनी तो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर इतरांनी त्याला दिलेल्या सकरात्मक प्रतिसादानंतर मला तो अंक आणि त्या अंकातील असलेल्या ईतर विषयांवर कुतूहल होतं पण अंक मिळत नव्हता , कालच्या रविवारी अनपेक्षितपणे कॉम्रेड नसीर शेख ह्यांनी तो अंक मला प्रत्यक्षात येऊन भेट दिला ह्याचा मला खूप आनंद झाला..
ह्या लेखात त्यांनी व्यक्त केलेले विचार आजच्या काळात सामाजिक चळवळीत कार्य करणाऱ्या खऱ्या कार्यकर्त्यांला एक योग्य दिशा देण्याची प्रेरणा देऊन जातं..'जय भीम' चित्रपट आजच्या परिवेशात भारतीय समाजाला तत्कालीन शोषक सत्ताक व्यवस्थेने केलेला अन्याय आणि अत्याचार इथल्या आजच्या समाजाला आरसा दाखविण्याचा काम केलं आहे..
समाजात अनादी काळापासून ते आजतागायत शोषण थांबलेलं नाहीये, फक्त त्याचं स्वरूप बदललं आहे, ह्या शोषणाला प्रतिकार करण्याचा,संघर्ष करण्याची मूळ तर्कसंगत प्रेरणा मार्क्स, फुले, आंबेडकर आणि पेरियारचं देऊ शकतात.. ह्या लेखात चित्रपटातील टिपलेल्या काही मोजक्या संवादातून जाती व्यवस्थेचे भयाण भीषण वास्तव आजही समाजमनात आढळुन येतात ह्याच दुःख वाटतं..
21 व्या शतकाच्या तिसऱ्या दशकांतही शिकले सवरलेले सो कॉल्ड 'सुशिक्षित अज्ञानी' ची डोके आजही सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या द्वेष मूलक ,जातीपातीच्या राजकारणाच्या पोस्ट पुढे आपला विवेक गहाण ठेवत समाजमनात वागताना चार-चौघात जाती साठी माती खाणाऱ्या महाभागांची संख्याही दिवसेंदिवस वाढतच जात आहे हे घातक आहे..त्यांच्या व्यक्तीगत पातळीवर असलेल्या धर्माच्या अस्मितेच्या भावनेला असलेलं द्वेषमूलक टोक आज खूप ठिकाणी टोचत आहे..
आपला लेख खूप आवडला कॉम्रेड,अद्यापर्यंत सर्वांनी केलेल्या परिक्षण-समीक्षेपलीकडे जाऊन आपण त्याला आजच्या परिस्थितीची जोड देऊन त्याच सामाजिक मूल्य अधोरेखित केलं आहे..
ह्या अंकातील इतरही लेख सामाजिक चळवळीत कार्य करणाऱ्या संघर्षत युवा नेत्यांनाही मार्गदर्शक आहेत..
DYFI ह्या विद्यार्थी संघटनेने नेहमीच विद्यार्थ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर काम करीत इथल्या युवकांना हक्काचं रोजगार मिळावा म्हणून देशभर आपल्या कुशल संघटनच्या माध्यमातून युवा-संघर्ष उभा केला आहे.. विद्यापीठीय शिक्षणात मी जरी AISFI मध्ये सक्रिय होतो तरी DYFI मध्ये आपल्या सारख्या मित्रांमुळे नेहमीच विद्यार्थी संघटनेत वैचारिक चर्चा नेहमीच होत होत्या..
ह्या अंकातील ईतर लेख...ही आजच्या घडीला प्रत्येक युवा नेत्यांना प्रेरणादायी वैचारीक मेजवानी असेल असं मला वाटतं..
आजच्या बेरोजगार तरुणांनी काय करावे? - प्रीती शेखर..
ऑनलाईन शिक्षणाच्या आडून सरकार अंग काढून घेत आहे - दत्ता चव्हाण..
कंत्राटीकरण-नवउदारमतवादी धोरणांचाच एक भाग..
जिल्हा परिषद शाळामधील ऑनलाइन शिक्षणाची दशा..-रोहिणी नवले
कोविड काळातील कैफियत: भांडवली शक्तीचा संधी साधुपणा -मुग्धा धुरंधर
शहीद कॉम्रेड धीरज- रोहिदास जाधव
वन निवासींवरील अन्याय थांबवा..! - डॉ. अजित नवले
सरदार उधम : विस्मरणात गेलेला क्रांतिवीर.!
हे सर्वं लेखही खूप उद्धबोधक आहेत..
अंकाच्या शेवटी असलेली कबिरानंद यांची एक मार्गदर्शक कविता मात्र खूपच भावली...
© विद्यार्थीमित्र..
Post a Comment