1. एखादी व्यक्ती आपला फोन उचलत नसेल तर त्या व्यक्तीला दोन वेळेच्यावरती परत फोन करू नका , कदाचित त्या व्यक्तीला त्यावेळेस तुमच्या फोनपेक्षा महत्त्वाचे काम असेल.
2. तुम्ही एखाद्याकडून उधार घेतलेले पैसे त्याने परत मागण्याअगोदर परत करा , तीच गोष्ट छत्री आणि पेनबाबत
3. एखादा तुम्हाला हॉटेलमध्ये जेवायला नेतो तेव्हा मेनूतील महागडा पदार्थ ऑर्डर करू नका , शक्य असल्यास देणाऱ्यालाच ऑर्डर करायला सांगा
4. तुझ अजून लग्न झालं नाही ? तू अजून घर बांधलं नाहीस ? असले समोरच्याला अडचणीत टाकणारे प्रश्न विचारू नका कारण ती तुमची अडचण नाही
5. नेहमी आपल्यापाठुन येणाऱ्या व्यक्तीसाठी दरवाजा उघडा मग ती व्यक्ती स्त्री असो वा पुरूष कारण कुणाला चांगली वागणूक दिल्याने तुमचा कमीपणा होत नाही
6. तुम्ही मित्राबरोबर टॅक्सी शेअर केलीत आणि त्याच भाडे त्याने दिले तर पुढच्या वेळेस तुम्ही भाडे द्या
7. सगळ्या राजकीय मतांचा आदर करा
8. कधीच कोणाच संभाषण मध्येच खंडीत करू नका
9. जर तुम्ही कोणाची
मस्करी करत असाल आणि त्या व्यक्तीला त्याचा त्रास होत असल्यास ती मस्करी ताबडतोब थांबवा
10. जो मदत करतो त्याला धन्यवाद द्या
11. एखाद्याची स्तुती सगळ्यांसमोर करा पण त्याचे दोष त्यालाच सांगा
12. कोणाच्या वजनावर भाष्य कराण्याची काही आवश्यकता नसते. फक्त म्हणा तु छान दिसतोस किंवा दिसतेस , जर त्यांना वजन कमी करायचं असेल तर ते तुमच्याशी बोलतील
13. जेव्हा एखादा त्याच्या मोबाईल मधील फोटो तुम्हाला दाखवतो तेव्हा डावी उजवीकडे स्क्रोल करू नका , कारण तुम्हाला कल्पना नसते पुढे काय दिसेल
14. जेव्हा आपला सहकारी डॉक्टरकडे जातो आहे असं म्हणाला तर, कशासाठी का असे प्रश्र्न विचारू नका फक्त तु ठिक आहेस अशी आशा करतो एवढच म्हणा.
त्याला सांगायचं असल्यास तो सांगेल , तुम्ही त्याला खाजगी स्वरुपाच्या आजाराबाबत विचारून खजील करू नका
15. जेवढा मान साहेबाला द्याल तेवढाच शिपायाला दर्या. आपल्या हाताखालच्या माणसांना तुम्ही कीतीही आदराची वागणूक देता यावर तुमच्या व्यक्तिमत्वाची उंची ठरवली जाते
16. एखादा माणूस आपल्याशी समोरासमोर बोलत असल्यास सतत मोबाईल मध्ये लक्ष देणे ही अक्षम्य चूक ठरते
17. जो पर्यंत सल्ला मागितला जात नाही तोपर्यंत देऊ नका
18. जेव्हा एखाद्याशी बऱ्याच वर्षांनी भेटत असाल तेव्हा जोपर्यंत विषय निघत नाही तोपर्यंत त्याचे उत्पन्न व वय याबाबत विचारू नका
19. जोपर्यंत एखाद्या विषयात तुम्हाला समाविष्ट केले जात नाही तोपर्यंत त्या विषयापासून लांब रहाणे योग्य
20. रस्त्यात कोणाची भेट झाल्यास गॉगल काढून संभाषण सुरू करा , ह्यातून आदर प्रतित होतो तसेच साफ संभाषणाच्या दृष्टीने डोळ्यांचा संपर्क आवश्यक असतो .
हा संदेश आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक आहे......😊
Post a Comment