आज सकाळी डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन मित्र परिवारात एक पर्यावरण प्रेमीं आणि आमच्या विद्यार्थ्यांना सदैव हसत खेळत सहज मार्गदर्शन करणाऱ्या आम्हां सर्वांच्या स्नेही आदरणीय नयना गुप्ता ताईनी विविध प्रकारच्या अनेक वन-औषधी गुणधर्म युक्त असलेल्या छोटया प्लांटची एक भेटवस्तू देत विद्यार्थ्यांसह आमच्या पारस बागेत स्वतःत्यांचं वृक्षा रोपण करून त्याची शास्त्रीय माहिती विद्यार्थ्यांना अगदी दिलखुलास पद्धतीने दिली..
परभणी जिल्ह्यातील आपला वृक्ष-संवर्धनाचा सामाजिक उपक्रम नेहमीच कौतुकास्पद असतो..
आपण जिथं जाल तिथं आपल्या सोबत विविध प्रकारच्या झाडांच्या बिया, छोटे छोटे रोपटे, वृक्ष-संवर्धनासाठी असलेली उपयुक्त माहिती-पत्रके, वृक्षारोपण कार्यक्रमांची माहिती, सामाजिक वनीकरण विभागाच्या अनेक समाजपयोगी कार्यक्रमांची पुस्तिका...ई. सारा व्याप असतांना विविध प्रतिष्ठाने,क्लासेस, अकॅडमी, स्वयं-सेवी-संस्था या सर्वच ठिकाणी आपली प्रथम पसंती तेही फक्त वृक्ष-संवर्धनासाठी..
आज आपल्या वृक्ष-रुपी सदिच्छा भेटीनं, आमच्या पारस बागेत एक नवी बहर नक्कीच येईल आणि आमच्या विद्यार्थ्यांनाही नेहमीच ती कायम स्मरणात राहील...
आदरणीय नयना गुप्ता ताई आपण करीत असलेल्या समाज-उपयोगी आणि पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन कार्यासाठी सदैव शुभेच्छा आणि सदिच्छा...
आम्हांस आपला सदैव सार्थ अभिमान..
आपल्या सदिच्छा भेटीस हार्दिक आभार...
📚 आपलाच स्नेही..
#विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख, परभणी..
"Stay Hungry & Stay Foolish"
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
"Nurturing Potential Through Education"
🔰 A Foundation For Education , Knowledge and Development✍🏻
https://www.vidhyarthimitra.com
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Post a Comment