कोचिंग क्लासेस व्यावसाईक क्षेत्रात प्रामाणिकपणे कार्य करणारा आजच्या काळातील खाजगी शिक्षक हा व्यक्तिगत निष्ठा आणि व्यावसायिक प्रतिष्ठा जपत ज्ञान-दानाचं पवित्र कार्य करीत विद्यार्थी आणि पर्यायी समाज घडविताना कोणत्याही प्रकारच्या स्पर्धेला किंवा आव्हानांना भिण्यापेक्षा त्याचं नेहमीच स्वागत करून व्यावसाईक कौशल्य विकसित करून स्वतः सक्षम बनतो आणि विद्यार्थी घडविण्यासाठी नेहमीच सज्ज असतो..
ज्यांची स्व:निष्ठाचं डळमळीत आहे ते नवं काही स्वीकारत नाही किंवा नवं काही निर्माण होऊ देत नाही किंबहुना त्यांच्यात नवंनिर्मितीची क्षमता ही नसते,ते केवळ संधी साधून इतरांच्या मार्गात अडथळे निर्माण करण्यासाठी अयशस्वी प्रयत्न करतात...
निकोप स्पर्धेत प्रतिस्पर्धी कितीही बलाढ्य असू द्या तो आत्मविश्वासाने आणि कठीण परिश्रमासोबत आपल्या प्रामाणिक प्रयत्नांने आपलं यश निश्चितच खेचून आणतांना प्रतिस्पर्धीचाही आदर करीत, इतरांनाही प्रेरणा देत मार्गदर्शक ठरतो.
स्पर्धेपेक्षा सहकार्य आणि गुणवत्तापूर्ण कौशल्य गुणांनी तो नेहमीच सरस असतो...
स्पर्धेचं स्विकार हे आव्हान असतेच पण त्यासोबत अनेक अनपेक्षित सुसंधी ही आपलं व्यक्तीमत्व आणि प्रतिष्ठेसह आपलं सामाजिक मूल्य ही निश्चित करतं...
निकोप स्पर्धेच्या पलीकडचा अहंकार आणि जीवघेणी तीव्र स्पर्धा विनाशाला न कळत आमंत्रण देणारं असतं,हे कोणत्याही व्यवसायाला अपवाद नसणारं सूत्र..
कोचिंग व्यवसाय क्षेत्र विशिष्ट ज्ञान-संपादन करून कौशल्य आधारित असुनही तो योग्य प्रकारे सुसंघटित नसल्याने आजच्या कोरोनात्तर काळात आपल्या अस्तित्वाची लढाई साठी सुसज्ज आहे का..?
कोरोना महामारीच्या काळात स्वतः च्या अस्तित्वासाठी धडपड करीत अनेक अनपेक्षित आव्हानांना तोंड देतांना ती आव्हाने पेलण्याची सक्षमता त्याच्याकडे नव्हतीचं..
कोरोना काळात टुयशनला पर्यायी व्यवस्था म्हणून विद्यार्थी आणि पालकांनी ऑनलाइन शिक्षण व्यवस्थेचा स्वीकार करीत त्याच्या अस्तित्वाला प्रश्न-चिन्ह उपस्थित केले, ह्यावरून ऑनलाइन शिक्षण आजच्या उंबरठ्यावर हैदोस करतांना ती पर्याय की पुरक असा घोळ असतांना , येणाऱ्या नव्या शिक्षण प्रणालीत त्याचा श्वास गुदमरणार तर नाही ना?
ज्यांनी हा व्यवसाय संधी (चान्स) म्हणून स्वीकारला ते ईतर व्यवसाय कडे नक्कीच वळतील आणि नफेखोरी करतील परंतु ज्यांनी व्यवसायाच्या पलीकडे जाऊन आवड ( चॉईस) म्हणून स्वीकारताना एक प्रदीर्घ संघर्ष करीत , व्यवस्था परिवर्तन, समाज प्रबोधन, सामजिक बांधिलकी, ग्रामीण भागात खरा शिक्षण-प्रसार, आधुनिक सामाजिक आणि नैतिक मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजवली,व्यवसायिक प्रतिष्ठा आणि व्यक्तीगत निष्ठा जपली,आपल्या अथक प्रयत्नाने विद्यार्थ्यांच्या जिवापाड प्रयत्नांना यशाचा सुगंध देत त्यांचं भावी जीवन सफल करून अनेक पिढ्या घडविताना समाज आणि पर्यायाने राष्ट्र निर्माणात आपला सिहांचा वाटा उचलला , आज तो कोरोनत्तर काळात त्याची खरी स्थिती काय आहे,त्याच्या उदरनिर्वाहाकडे कोणी डुंकुन पाहायला तयार नाही ?
आपल्या अहोरात्र प्रयत्नांने शैक्षणिक कौशल्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची योग्य पूरक जोड देऊन कोचिंग व्यवस्था ही शिक्षण व्यवस्थेला पर्याय म्हणून न पाहता ती पुरकच आहे हे ज्यांनी सिद्ध केलं , आज त्याची अवस्था दयनीय आहे, त्याकडे शासन ,शिक्षण व्यवस्था लक्ष देईल का?
मागील दोन दशकांत शैक्षणिक क्षेत्रात नव-नवं प्रयोगांमुळे शिकणं आणि समजून घेणं आणि त्याचं व्यवसाय-भिमुख क्षेत्रात रुपांतर करून ज्ञानधिष्ठित समाज विकासात त्याची अप्रत्यक्ष भूमिका महत्त्वाची ठरतं आहे.
व्यवसाईक सेवा क्षेत्रात दिवसरात्र ज्ञान दानाच पवित्र कार्य करीत असतांना त्या व्यसतेत कदाचित तो आपली सामजिक आणि राजकीय कर्तव्ये विसरला असेन म्हणून आज ही वेळ त्याच्यावर का आली हे कोणाच्याच लक्षात का नाही आलं?
ह्या क्षेत्राला खरंच कोणी वाली नाही का? प्रस्थापित संघटना ह्या केवळ विशिष्ट मक्तेदारीचं प्रतिनिधीत्व करतात का? त्या सर्वसामान्य क्लासेस संचालकांच्या न्याय-हक्क पूर्ण मागण्यांसाठी कधी शासन दरबारी योग्य पाठपुरावा करतात का? धुर्त राजकारण्यासारखी जाती-पाती आणि द्वेष-मूलक बाबींना खतपाणी घालून एकमेकांच्या स्पर्धेत आपलं व्यक्तिगत हित जोपासताना दिसतात, स्थानिक पातळीवर पदांची विभागणी आणि वाटप हे केवळ आर्थिक हितसंबंधी असतात का?
विविध कार्यक्रमाचे नियोजन हे केवळ एकमेकांच्या व्यवसायाला विद्यार्थी पुरविणाऱ्यासाठी पूरक पोरखेळ किंवा जोडधंदा (Cut-Practice) असतो का? घोषणाच्या माध्यमातून आश्वासनाची खैरात असतें का?
हा सर्व विचित्र प्रकार असे लोक करतात ज्यांनी हा सेवा (चॉइस)म्हणून न स्वीकारता केवळ धंदा (चान्स) म्हणून स्वीकारलेला आहे,आज ह्याच महाभागांमुळेचं हे क्षेत्र योग्यरित्या सु-संघटीत न झाल्यानें हा व्यवसाय कोरोणोत्तर काळात अडचणीत आलेला आहे..
ह्यांनी कधीच सर्वसामान्य क्लासेस संचालक जो पूर्णपणे ह्या क्षेत्रात समर्पित भावनेनं कार्य करतो त्याच्या सामाजिक सुरक्षिततेचा कधीच विचार केला नाही,उलट शाळा कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या दुहेरी शिक्षकांना पाठिशी घालीत इतरांना मानसिक त्रास देण्याचा सतत प्रयत्न केला , आजच्या घडीला आपणा सर्वाचे क्लासेस पुर्ववत होण्यासाठी कधीच आक्रमकपणे आपली भूमिका शासन दरबारी प्रकर्षांने मांडली नाही,त्यामुळेच त्याच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे..
आता बस्स झालं...!
ह्यापुढे समर्पित सेवावृतीने आणि प्रामाणिकपणाने ह्या क्षेत्रात कार्य करणारे अनेक पूर्णवेळ खाजगी शिक्षक शांत बसणार नाही..
आता तो जागृत असून, अजून तो अन्याय सहन करणार नाही..
खऱ्या अर्थाने जर तो जागा झाला तर त्याच्या अस्तित्वाला किंमत असेल अन्यथा त्याचा श्वास गुदमरेल..
ज्यांनी हा व्यवसाय समर्पित भावनेने (पूर्णवेळ) स्वीकारून ह्या व्यवस्थेला आव्हान देत जो काही संघर्ष करीत आहे, त्या प्रत्येक क्लास संचालक बंधूंना अगदी मनापासून सलाम आणि सदैव सदोदित आदर..
येणाऱया काळात ह्या क्षेत्राला पूर्णपणे न्याय देऊन आपली सामाजिक सुरक्षितता आणि व्यवसाईक बांधिलकी जपत अपेक्षित आणि अनपेक्षित आव्हानांचा स्वीकार करीत ज्ञान-दानाचं पवित्र कार्य पुरकपणे पार पाडताना समाज आणि पर्यायाने सशक्त राष्ट्र निर्माणात आपलं सिहांचा वाटा सिद्ध करून आपलं सह-अस्तित्व अजरामर करूया..
आजच्या या जीवघेण्या स्पर्धेच्या युगात श्वास घेण्याइतकी जागा नसतांना मित्रांनो , स्पर्धे-ऐवजीं सहकार्य ,सहप्रयोग, सह-अनुभुती, सह-निर्मिती, समस्यापुर्तीतुन प्रमाणिकता ठेऊन एकजुटीने संघटनात्मक आणि एक दिलाने आपल्या व्यावसायिक क्षेत्रातील दिवसागणिक येणाऱ्या अनेक नव्या अडचणी वर मात करून आपलं अस्तित्व टिकवूया असं मला वाटतं.
" सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं हैं।
मेरी कोशिस हैं क़ि ये सूरत बदलनी चाहिये !"
खूप काही व्यक्त व्हायचं आणि त्या अन्याय्याला वाचा फोडण्यासाठी आपली साथ हवी मित्रांनो..😢
आपल्या काही सकारात्मक सूचनांचे सदैव स्वागतचं मित्रांनो..🙏🏻
📋 विशेष टिपण्णी:
संबंधित लेखात व्यक्त केलेले हे माझं स्व:अनुभव असून त्याचा कोण्या व्यक्ती किंवा संघटनेशी काहीही संबंध नाही ,असल्यास तो योगायोग असेल.
वरील सर्व विचार हे माझं व्यक्तिगत मत असून ,कोणाच्या भावना दुखावण किंवा कोणाला उद्देशुन मत व्यक्त करणे असा कोणताही हेतू नाही.
🙏🏻आपलाच स्नेही संचालक बंधू:
🎓 #विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख,परभणी.
डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
एसके कोचिंग क्लासेस, परभणी.
https://www.vidhyarthimitra.com
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Post a Comment