जागतिक आनंदाच्या क्रमवारीत 136 वा असलेल्या देशातला 1 नंबरचा आनंदी व्यक्ती....
मला माहित नाही की हे मी लिहितो आहे ते किती जणांना पटेल. पण गेली 3-4 वर्ष मी पाळत असलेले नियम सांगतो. हे नियम जर तुम्ही Follow केले तर नक्कीच पुढील 3 महिन्यात सर्वात चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडतील.
नियम:
1) आपल्या सर्व आवडत्या नेत्यांना unfollow करा.
2) सोशल मीडियावर धार्मिक/ जातीय/ राजकिय कट्टर असणाऱ्या लोकांना unfollow करा.
3) सर्व Inspirational व प्रेरणा देणारे पेज "See First"किंवा Favourite करून ठेवा.
4) सोशल मीडियाचा वापर फक्त आर्थिक बळकटी व networking साठी करा. (माझ्याकडे येणारी प्रत्येक संधी, एक-एक रुपया ही सोशल मीडियामुळे येतो)
5) पुढील 66 दिवस फक्त स्वतःच्या प्रगतीचा विचार करा.
6) 66 दिवस सोशल मीडियावर फक्त स्वतःबद्दल लिहा. स्वतःचे कौतुक लिहा. (जे लिखाणातून hate पसरवत असतात त्यांचे Self-Love कमी झालेले असते. स्वतःचे कौतुक केल्याने आपोआपच आपण स्वतःवर प्रेम करू लागतो. रोज 4-5 तरी सेल्फी काढा.)
7) तुमच्या धर्माच्या WhatsAap ग्रुपमध्ये फक्त तुमच्या प्रगतीच्या पोस्ट टाका म्हणजे तिथून तुम्हाला Remove केले जाईल. तुम्हाला यातून नक्कीच कळेल की त्यांना तुमची प्रगती नको आहे.
8)Negative comments करणाऱ्याना डिलीट किंवा ब्लॉक करा.
9) कोणत्याही प्रकारच्या ism किंवा विचारसरणी मध्ये अडकू नका..
10) राजकीय भूमिकेचं उघड उघड समर्थन नकोच, त्यानं छुपे शत्रुत्व येते ते टाळा..
11) मी या धर्माचा, जातीचा, विचाराचा असे म्हणण्यापेक्षा Universal Mindset ने जगाकडे पहा.
12) Goal setting करा. ज्यांच्या आयुष्यात Goal नाही ती लोक दुःखी असतात.
13) धर्माची कट्टरता डोक्यातून जात नसेल तर "कृसेडस" चा इतिहास वाचा, मानवजातीचा इतिहास वाचा. एकदा का धर्माच्या कट्टरतेने किती नुकसान झाले आहे ते कळले की धर्मभिमान गळून पडतो.
14) 3 वर्षाच्या आर्थिक प्रगतीचे Goal लिहा. ते Achieve झाल्याशिवाय माझा धर्म, पक्ष, नेता यांच्याबद्दल पोटतिडकीने बोलणार-लिहिणार नाही अशी प्रतिज्ञा करा.
15) Self Growth हा एकच मूलमंत्र ठेवा. "You are happy when you progress" हे लक्षात ठेवा.
16) काहीही झाले तरी कोणताही नकारात्मक reply देऊ नका. Reply मध्ये Positive, Funny किंवा "Thank You" एव्हढेच शब्द वापरेन अशी प्रतिज्ञा करा.
17) जसा वेळ मिळेल तसा प्रेरणादायी पुस्तकें वाचून त्यातून सकारात्मक ऊर्जा घेऊन रचनात्मक कार्य करा..
18) चांगल्या मित्र परिवारांच्या संगतीत मनमोकळ्या गप्पा करा..
19) आपल्या कुटुंबाला Quality Time दया..
20) लहान मुलांसोबत मनसोक्त खेळा-हसा..
हे नियम पुढील 66 दिवस वापरून पहा. तुमच्या आयुष्यात नक्कीच प्रगती होईल.
शेवटचा नियम- मोठे स्वप्न पहा. त्या दिशेने दररोज एक एक पाऊल टाकत जा..
Post a Comment