जीवनात बदल घडविणारा ,आयुष्याला एक नवी दिशा आणि प्रेरणा देणारा सुंदर कार्यक्रम आरंभ इन्स्टिट्यूट आणि प्रेरणा फाउंडेशन वर्धा मित्र मंडळ परिवाराच्या वतीने येत्या 12 एप्रिलला वर्धा येथे पार पडत आहे... ह्यापेक्षा मला सर्वाधिक आनंद जो गगनात मावेना तो म्हणजे ह्या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या प्रमुख मार्गदर्शक वक्त्यांमध्ये सुप्रसिद्ध युवा व्याख्याते श्री.गणेश शिंदे सरांसोबत विद्यार्थ्यांना माझंही करीअर संदर्भात मार्गदर्शन असल्याचं.. नुकताच मला संयोजकांनी कळवलं..
शैक्षणिक-सामाजिक सेवा क्षेत्रात कार्य करतांना स्वतःचं कर्तृत्व नेतृत्वात सिद्ध होतांना स्वतःला सतत अद्यवयत (update) आणि जिज्ञासेपोटी सुधारणा (upgrade) करीत असतांना विविध समाज माध्यमांवर अभिव्यक्त होतांना व्यापक विचारांचं मुक्त चिंतन करतांना , इतरांनकडूनही दररोज नवं नवे काही नित्य शिकताना आणि अनुभव घेतांना आपल्या व्यापकतेच्या कक्षेची व्याख्या दिवसेंदिवस रुंदावतांना आपण कमी पडू का ही भीती नेहमीच मनाला अजून उभारी देते...
कोणत्याही प्रकारच्या राजकीय किंवा पक्षीय संघटना किंवा राजकीय भूमिकांपासून कोसोदूर असतांना सामाजिक कार्यक्षेत्रात उत्स्फूर्त सहभाग नोंदवितांना, व्याख्यानं, चर्चा, परिसंवाद, नियमित विषयांवर असलेल्या तासिका, करीअर आणि विद्यार्थी व्यक्तीमत्व विकास कार्यक्रम, काही संपादित लेखन,फेसबुकवर होणाऱ्या चर्चा-वाद , विविध ब्लॉग्सवर टिपण्या व्यक्त करताना त्यांना सुधारणात्मक दिलेल्या काही वेधक सूचना,वर्तमानपत्रातील काही संपादकीय लेखावर व्यक्त केलेले विचार, त्रैमासिक आणि नियमित मासिकांमध्ये केलेलं लेखन, पुस्तक परीक्षण-समिक्षा,अक्षरनामा वरील वैचारिक लेखाचं टिपण,सप्तरंग, चतुरंग, लोकरंग,युवा-विविधा, वैचारिक दिवाळी अंक, Ted Talks, Josh Talks , The Quest, The Wire, Blog-लेखन, सकाळ समूह आयोजित ऑनलाइन विविध चर्चा सत्रात असलेला सहभाग, Youtube वरील प्रा. नितीन बांनगुडे पाटिल सर पासून ते संदीप माहेश्वरी आणि युवा व्याख्यातें श्री. गणेश शिंदे यांच्या पर्यंत न संपणाऱ्या यादीतुन दररोज एक नवा विचार आत्मसात करतांना..
यां सर्वांपासून आपल्या विचारांच्या शलाकेला व्यापकता प्रदान करीत सातत्यानं विचार-चिंतन मंथनातून आपल्या लेखन आणि वक्तृत्व कौशल्याला कुठं निश्चित दिशा मिळतं का ह्याचा शोध घेतांना प्रेरणादायी कर्तृत्व आणि युवा व्याख्याते श्री. गणेश शिंदे यांचे मार्मिक विचार मनाला भावते..
शैक्षणिक क्षेत्रात प्रेरणा देणाऱ्या Mass Motivation च्या भाऊ गर्दीत Massive Value प्रस्थापित करणारे खूप कमीचं..! पण श्री. गणेश शिंदे माझ्यासाठी सदैव आदर्शवृत्तचं..!
संत परंपरेतल्या ज्ञानेश्वर माऊली ते जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या वचन-प्रवचनांना आजच्या काळात सपशेल लागू करतांना जे दृष्टांत आपण ज्या मार्मिकतेने आजच्या नवं-तरुणांना आणि विद्यार्थ्यांसह पालकांना पटवून देण्याची सुंदर वक्तृत्व शैली आपली जडणघडण आणि संस्कार किती सहजपणे प्रेक्षकांशी संवाद साधताना लक्ष वेधून घेणारी असते ..हे आपल्या विविध मार्गदर्शन कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रकट होते हे निदर्शनास येते..
आपल्या एका प्रसिद्ध कार्यक्रमाची Audio Clip
( कदाचित भुट्टे पाटलांच्या शाळेत गुण-गौरव समारंभ असेल आणि त्यात निशीगंधा वाड ताईही होत्या ) आमच्या विद्यार्थी मित्र परीवाराचा गुणी विद्यार्थी प्रकाश खंदारे ह्यांनी सन 2015 साली मला ऐकवली.. आणि आमच्या सर्वं शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांनाही खुपच आवडली..
परभणी जिल्हा कोचिंग क्लासेस संचालकांच्या गुरू-गौरव कार्यक्रमात आपण प्रमुख मार्गदर्शक म्हणून यावे आणि आपले शैक्षणिक-सामाजिक विचार आजच्या शिक्षक आणि पालकांना दिशा-दर्शक व्हावे ह्यांसाठी मी खूप आग्रही होतो पण आपली Date न मिळाल्यानं निराश झालो होतो..
सोशल मीडिया आणि YouTube च्या माध्यमातून गेली 8 वर्षं मी आपणांस Follow करत आलोय.. आपल्या शैक्षणिक-सामाजिक विचार मंथनातुन समाज-शिक्षण-संस्काराच्या विकासाचा प्रगल्भ आणि संवेदनशील विचारांचा एक समान धागा माझ्या सारख्या एका प्रयोगशील शिक्षकाला आपला स्नेह-सहवास-मार्गदर्शन लाभेल ह्याचा मी स्वप्नांत ही विचार केला नव्हता, कदाचित सम-समान सामाजिक ध्येयाला आपल्या सारख्या सारथीची आवश्यकता असेल..
आपल्या कडून खूप काही शिकायचं आहे..!
येत्या 12 एप्रिलला आपली होणारी प्रत्यक्ष भेट माझ्यासाठी एक पर्वणीच असेल..!
बाकी आपण प्रत्यक्षात भेटल्यावर सविस्तर बोलुचं..!
रास्ते आवाज दे रहें हैं.. सफर जारी रखना हैं मेरे दोस्त..!
धन्यवाद..🙏🏻
🎓 आपलाच विनम्र स्नेही आणि आभारी.🙏🏻
विद्यार्थी मित्र प्रा. रफीक शेख..
डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
https://www.vidhyarthimitra.com
Post a Comment