कालचा (22 जानेवारी 2023 रोजी) निफाडचा कार्यक्रम आटोपून लासलगावहून आदरणीय श्री. उल्हास पाटील सरांनी मनमाडला सकाळी 7 ला सोडलं..
परभणीकडे जाणारी सचखंड एक्सप्रेस दीड-तासाने प्लॅटफॉर्मवर आली.. त्यात B4 कोच मध्ये सीट क्र.67 वर विसावून सकाळी सकाळी होणारी धावपळ थांबून 5 तासांत परभणी सहज गाठूया असा उसासा टाकत , आजच्या दिवस भर असलेल्या व्यस्त दिनक्रमाच हूर लागलं..!
तेवढ्यातचं माझ्या समोरच्या सिटवर बसलेले एक जेष्ठ शिख ग्रहस्थ त्यांच्या टिपणात मग्न असल्याचे दिसलें..मी आपला मोबाईल फ़ोन काढुन कालच्या कार्यक्रमाचे फ़ोटो गुगल ड्राइव वर अपलोड करीत असतांना अचानक त्यांची नजर माझ्यावर पडली आणि त्यांनी मला विचारलं 'कींथे जानां तुसी..?'
माझ्या सामाजिक गुणधर्माने मी सहज त्यांच्या सुरात सूर मिसळीत त्यांना प्रतिसाद देत देतं औरंगाबाद - जालना पर्यंत आमच्यात संवाद सुरु झाला..
सचखंड एक्सप्रेस मध्ये काल सकाळी 9 वाजता अंबाला (कॅन्ट-जंकशन) येथून नांदेडला जाण्यासाठी एकटेचं बसलेले हें ग्रहस्थ सेवानिवृत्त कर्नल जे. एस. मुलतानी आहेत.. दोन मुलं आहेत.. एक कॅनडाला तर दुसरा शिकागोला.. एका बहूराष्ट्रीय कंपनीत उच्च-पदस्थ कर्मचारी असून..सन 2007 ला आर्मी मधून सेवा-निवृत्त झाल्यानंतर 2010 पासून पंजाब आणि हरियाणा येथे एका शैक्षणिक-सामाजिक संस्थेत स्व:ईच्छेनें कार्य करण्याची त्यांची धडपड त्यांच्या सुंदर हिंदी - इंग्रजी आणि पंजाबी संवादात दिसून आली.. मी मात्र खुप प्रभावीत झालो..
माहित नाहीं पण आयुष्याच्या जीवन-प्रवासात 'लॉ-ऑफ-अट्रॅकशन' कसं कामं करत कीं बुंवा..!
माझ्या आणि त्यांच्या कार्यात एक छान साम्यपणा..! म्हणजे शैक्षणिक-सामाजिक कार्य करण्याचा प्रचंड उत्साह..! तसा वयाचा आणि स्थितीचा, वेळेचा आणि अनुभवाचा, पदाचा तेवढाचं फरक मात्र..!
शैक्षणिक-सामाजिक कार्य क्षेत्रात कामं कसं करावं, आपल्या समोर कोण कोणते सामाजिक प्रश्न आहेत, व्यवस्था किती आणि कशी अपयशी..सामाजिक संर-रचनेत आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय पेचा समोर समाजातील दुर्बल आणि वंचित घटकांचे राजकारण्यांनी केवळ आपल्या स्वार्थापोटी प्रलंबीत ठेवलेल्या प्रश्नांमुळे समाजाची व्यापक स्वरूपात होणारी सामाजिक प्रगती आणि आर्थिक ऊन्नती हेतूपुरस्पर रोखण्याची धूर्त षढयंत्रणा , धर्मांधतेची भूल देऊन कसे झूलवत ठेवतं, आणि त्यातून अनेक पिढ्यानं पिढ्या बरबाद होऊन देशाची प्रगती खुंटली जाती.. ह्यावर कशी मात करावी..
गरीब आणि दुर्बल घटकांतील मुलांचे शैक्षणिक प्रश्न शासन दरबारीं नं सुटल्यास त्याच 'सोशल मॉडल' कसं उभारावं.. आम्ही नेमकं काय करतो, कसं करतो.. औद्योगिक क्षेत्रातल्या CSR Fund दानविरांची साखळी जोडून हें काम अधिकाधिक व्यापक स्वरूपात होणं गरजेचं आहे हें आमच्या प्रवासतला गंभीर विषय..
मी पण असंच काहीतरी करतोय.. हें ऐकल्यावर तें खुप आनंदित झाले..आयुष्याच्या संघर्षरत प्रवासात अशी अनेक माणसं भेटल्यावर काहीतरी नवं काही शिकवून प्रेरणा देतात..
आमच्या गप्पात मी पंजाब राज्यात आम आदमी पार्टीच्या सरकारचं जनहितार्थ काय काय योजना राबवित आहे, ह्याचा वेध घेतला तर कळलं कीं मा. अरविंद केजरीवालचं दिल्ली मॉडेल पंजाबला तंतोतंत लागू करताना पंजाबचे मुख्यमंत्री मा. भगवंत मान सध्या कोण कोणत्या दिव्यांनां सामोरे जातायत ह्याचा अंदाज घेतला तर कळलं कीं खुप साऱ्या जनहितार्थ योजना विद्यमान सरकार प्राधान्यक्रमानें हाती घेऊन शैक्षणिक - सामाजिक विकासात पंजाब राज्याला देशात एक नवी ओळख निर्माण करण्यासाठी हातभार लावल्याचं त्यांच्या कडून कळलं..
इतर राज्यापेक्षा (भाजपतेत्तर राज्य ) केरळ आणि तामिळनाडू नंतर दिल्ली आणि पंजाब सरकार शैक्षणिक गुंतवणूक वाढवून देशाच्या विकासात पायाभूत योगदान देतं आहेत..
कॅनडा स्थित असलेल्या मुलांनी त्यांना तिकडे येण्याचा आग्रह केला पण कर्नल साहेबांनी आर्मीतून सेवा-निवृत्त झाल्यानंतर आयुष्याचं उरलेलं हर एक दिवस शैक्षणिक-सामाजिक सेवेतून देश-समाजासाठी आपलं आयुष्य वेचन्याचं निश्चित केलंयं.. किती उत्साह..! , अजून अभ्यास..! , देशभर प्रवास , स्वयं-सेवा भावी संस्थांना , औद्योगिक क्षेत्रांना आणि शैक्षणिक संस्थांना भेटी , वयाची आणि आरोग्याची तमा नं बाळगता सेवा-निवृत्ती नंतरहीं देशसेवा करण्याची नशा काही औरच..
मागील 10 वर्षांत उभं केलेल्या कार्यातून घडलेले विद्यार्थी आणि स्वयं-सेवक यांच्या स्नेह-सहकार्यातून शेकडो मुलं मेडिकल , इंजिनीअरिंग आणि सामाजिक कार्यक्षेत्रांत आपलं कार्य कर्तृत्व सिद्ध करीत आहेत ह्याचा त्यांना अभिमान वाटला.
आदरणीय कर्नल साहेब आपल्या कार्य-कर्तृत्वाला अगदी दिल सें सलाम ..!
आमच्या गप्पात सेलू नंतर माझं स्टेशनं परभणी कधी आलं कळलं पण नाहीं.. त्यांनी मला अनेक शुभेच्छा सह आशीर्वाद दिला आणि पंजाबला येण्याचं आमंत्रणहीं दिलं..
गेल्या तीन दिवसापासून सलग प्रवासात आहे, नित्य नवे माणसं Same Frequency ची कशी भेटतात आणि जुळतात कशी ? हाच प्रश्न मला आता पडतोय..!
आयुष्य समृद्ध करणाऱ्या गोष्टीमध्ये प्रचंड वाचन, मनसोक्त सोलो प्रवास, प्रवासात भेटलेल्या माणसाच्या वैचारिकतेची आणि सामाजिक-कार्याची ओळख, नव्या नव्या गोष्टींचा अनुभव, टिपलेल्या नोंदी, मिळालेली एक कार्य प्रेरणा, जपलेल्या स्मृति आणि विहार करताना घेतलेंल्या विविध आहारांचा रसा स्वाद आणि प्रवास वर्णन मला खुपचं भावतें मित्रांनो.
श्वासाच्या शेवट - पर्यंत मानवी समाजाच्या सामाजिक प्रगती आणि आर्थिक उन्नतीसह चिरंतन मानवी मुल्यांच्या प्रेरणेसाठी आयुष्य समर्पित करावं हेंच ध्येयं उराशी बाळगून जिवन जगण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो..
आपलाच..
-विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख..
एक संवेदनशील सह-प्रवासी..
डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
Hats of u sirji 💐💐💐🙏🙏
Very nice,Sirjee
Post a Comment