ग्रेट भेट : सतीश कुमार.. (सुफी काव्यमंच चळवळ,दिल्ली.)
मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या 53 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने पुणे येथील डेक्कन जिमखाना परिसरात आयोजित केलेल्या एका चर्चा सत्रात बिहार येथील माजी राज्यसभा खासदार, पसमांदा चळवळीचे अध्यक्ष मा. अन्वर अली अन्सारी यांच्या उपस्थितीत 'भारतीय मुस्लिमांचीं सध्यस्थिती, भीषण वास्तव आणि भविष्याची वाटचाल ह्या संवाद सत्रात सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठात पी. एच. डी. चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत सतीश कुमार आला होता..
संवाद चर्चासत्र सुरु होण्यापूर्वी शहा सरांनी माझी ओळख करुन त्या सर्वांनसोबत करुन देताना सतीश कुमार हा मूळचा दिल्लीचा पन पुण्यात थियटर मध्ये आपली कारकिर्द करण्यासाठी आलेला..
सुफी संगीत, भक्तीगीतं, अभंग, कबीर कें दोहे, विद्रोह विचार मांडणाऱ्या कवींचीं कवनें, पुरोगामी चळवळीत आणि किसान आंदोलनातील कार्यकर्त्यांना प्रेरणा देणाऱ्या नजम आणि कविता सादर करण्याचा उत्साह असलेला, आपल्या आवाजात स्वरमयी नाद माधुर्य असलेला, संगीत साधनेतूनचं स्वयं सिद्धता सिद्ध करण्याचा प्रचंड विश्वास, काळ-वेळ-स्थान सापेक्षता साधत काव्य साहित्यांतुन प्रेक्षकांना आपल्या सुंदर आवाजाने मंत्रमुग्ध करणारा हा सतीश कुमार पहिल्याचं भेटीत त्यांनं सर्वांना प्रभावीत केलं..
आमच्या दोघांत एकचं साम्य तो म्हणजे सुफी साहित्य आणि संगीतावर असलेलं प्रेम...पहिल्या भेटीतचं आमच्या मैत्रीचे स्वर जुळलें..
त्याच्याशी संवाद साधतांना त्याची स्वर-साधना आणि पुरोगामी साहित्यांवर असलेलं प्रेम मला खुप भावलं..
मित्रां, तुझ्या आवाजातला 'संघर्ष' हा आजच्या सामाजिक स्थितीत आपलं अस्तित्वाचा शोध घेणाऱ्या नवं तरुणाईना नक्कीच प्रेरणादायी आहे..
तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि भावी वाटचालीस लक्ष लक्ष सदिच्छासह शुभेच्छा..
-तुझाचं एक स्नेहीं मित्र आणि शुभेच्छूक :
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख.. डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
https://www.vidhyarthimitra.com
Post a Comment