एका रिक्षाचालकाचा मुलगा गरिबीच्या परिस्थितीमुळे कधी अकॅडमी जॉईन करू शकला नाही.टेनिस बॉलवरच खेळून त्याने जिद्द आणि प्रचंड मेहनतीनतीच्या बळावर संघर्षमय प्रवास करत भारतीय संघात स्थान मिळवले.
आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात त्याने सहा विकेट घेत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आणि 'प्लेयर ऑफ द मैच' किताब मिळवला.
'प्लेयर ऑफ द मैच' साठी त्याला मिळालेली रक्कम $5,000 म्हणजे 4,15,451₹ इतके पैसे त्याने तिथल्या ग्राउंड्समैनला दान केले.
तो म्हंटला, ह्या पैशाचे खरे हकदार ग्राउंड्समैन आहेत कारण ते नसते तर हा टूर्नामेंट यशस्वी होऊच शकला नसता!
त्याने विकेट घेऊन फक्त मैदानच गाजवलं नाही तर माणुसकी,प्रेम,आपुलकी आणि दुसऱ्याच्या कष्टाची जाण ठेवून त्यांना मदत करून त्याने सगळ्यांचे हृदय देखील जिंकले आहेत!
आपल्या कृतीतून माणुसकीचा आणि प्रेमाचा संदेश देणाऱ्या मोहम्मद सिराजला सॅल्युट!❤️
Post a Comment