एकीकडे शेतकऱ्यांच्या तर दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या आत्महत्या सत्र थांबेना...!
फार विदारक चित्र देशात आणि अवती-भवती सुरु आहे..दिवसेंदिवस येणाऱ्या अनेक बातम्या हृदयद्रावक असून आत्मचिंतन करून अस्वस्थ करणाऱ्या आहेत..😭
मागच्या दशकांत झालेली हीं वाढ सभ्य समाजाच्या मूल्य-उपभोगनाऱ्या मानवतेला प्रश्नांकित करणारी असून, ह्याची दाहकता आपलं भविष्य अंधःपतनांकडे घेऊन जाणारी तर नाही ना?
ह्याला जबाबदार समाज कीं शासन..?
व्यक्ती-समूह कीं व्यवस्था..?
समाजकारण कीं राजकारण..?
असंवदेनशीलपणा कीं जागृतता?
जीव-घेणी प्रचंड स्पर्धा कीं अस्तित्वाचा संघर्ष...?
उदारता कीं दुर्गुणता..?
धर्म:निरपेक्षता कीं धर्मांधता..?
व्यक्तीगत स्वार्थ कीं सामाजिक हित..?
धार्मिकता कीं सर्व-धर्मसमानता..?
अनपेक्षित अपेक्षाचं ओझं कीं अपेक्षित यशाची ओढ..?
सामाजिक द्वेष कीं सामाजिक बहिष्कार..?
व्यक्तीगत निष्ठा कीं सामाजिक प्रतिष्ठा..?
व्यक्तीदोष कीं व्यक्ती-मूल्य..?
मान कीं अपमान?
प्रचंड संपत्तीचा माज कीं दिवाळखोरी..?
श्रीमंती कीं गरिबी..?
सुखचैन कीं दारिद्र्य..?
ज्ञानीपणा कीं अज्ञानीं..?
उजवा विचार कीं डावी विचारसरणी..?
हुकूमशाही कीं लोकशाही...?
सुशिक्षितता कीं अशिक्षितता..?
व्यक्ती-मूल्य कीं नाते-संबंध..?
प्रेम कीं वासना..?
जीवन कीं मृत्यू..?
अश्या नं संपणाऱ्या अनेक विरोधाभाशी गोष्टी कारणीभूत आहेत कीं अजून काही?
आजच्या या जीवघेण्या स्पर्धेच्या युगात श्वास घेण्याइतकी जागा नसतांना मित्रांनो , स्पर्धे-ऐवजीं सहकार्य ,सहप्रयोग, सह-अनुभुती, सह-निर्मिती, समस्यापुर्तीतुन-आणि समुपदेशनातून आपण आपल्या अनेक समस्या सह-चर्चेने सोडवू शकतो मित्रांनो..
आत्महत्त्या सारखं टोकाचं पाऊल, आपल्या समाजिक जीवनात आपल्यावर अवलंबून असणाऱ्यांना जिवंत मारण्यासारखं आहे..
एकमेकांशी अगदी दिलखुलास आपल्या समस्याबाबत चर्चा करा, नक्क्कीचं त्यातून अनेक मार्ग निघू शकतात.. मित्रांनो..
जीवन हेचं संघर्ष आहे मित्रांनो, त्याचा अगदी मनापासून स्वीकार करा, आयुष्याच्या जीवन-प्रवासात नित्य-नवं काहीतरी शिकून त्याची अनुभव-शिदोरी गाठी बांधून ठेवा त्याचा सुयोग्य वापर आपल्या क्षमता आणि कौशल्याच्या संवर्धनांसाठी खर्च केला तरचं समस्या सोडविण्यासाठी त्याचा कस लागला तरंच आयुष्य यशरुपी सफल होईल असं मला विश्वास वाटतो मित्रांनो..
आत्महत्या' हे टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी..आयुष्याकडे संपूर्ण ताकदीनं सकारात्मक विचार अवश्य कराचं पण मित्राची आणि समुपदेशकांचीहीं अवश्य मदत घ्या मित्रांनो..
-आपलाच समुपदेशक मित्र..
विद्यार्थी मित्र प्रा. रफीक शेख,
The Spirit of Zindagi Foundation..
Post a Comment