मी हरवला आहे माझा देश..!
मला जोजवलं होत महावीर, बुद्धांच्या पाळण्यांनी ,
मला खेळवलं होतं ख्रिस्त , पैंगबरांच्या बाराखड्यांनी
मला चालंवलं होतं बसवण्णा, चक्रधर,
नानकाच्या पांगुळगाड्याने मला सजवलं होतं नामा,
तुकाराम ,शिवरायांच्या टोपड्याने...
धरलं होतं बोट माझं फुले, शाहू , मार्क्स, गांधी,
आंबेडकरांनी पाठराखण होते करत दाभोळकर,
पानसरे, कलबुर्गी आ्णि गौरी लंकेश..
निरोगी वाढ होतेय माझी अशीच नोंद सुदृढ़ बालकस्पर्धेत
काल रात्री झोपलो गाढ़ मजेत..
आज सकाळी माझ्या घरासमोरचं ते माझं नित्यपरिचयाचं अंगण ,
ज्याला आपला देश म्हणायचं असं परवचेसारखं
घटवुन घेतलं होतं मायनं , होतं गायब !
आंक्रंदतोयं मी,
मी हरवला आहे माझा देश की मीच हरवलो आहे ?
#अस्वस्थ_वर्तमानातुन
-विद्यार्थी मित्र प्रा. रफीक शेख
डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
Post a Comment