डॉ.नरेंद्र अच्युत दाभोलकर
जन्मदिन - 1 नोव्हेंबर 1945
नरेंद्र अच्युत दाभोलकर (नोव्हेंबर 1, इ.स. 1945 - ऑगस्ट 20, इ.स. 2013 ) हे मराठी बुद्धिवादी, विज्ञानवादी, समाजसुधारक व सामाजिक कार्यकर्ते, वैज्ञानिक दृष्टिकोन समाजात रुजविण्यासाठी आयुष्य वेचणारे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक,त्यांनी अंधश्रद्धांच्या निर्मूलनासाठी इ.स.1989 साली समविचारी कार्यकर्त्यांना जमवून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही संघटना स्थापली.
जीवन:
नरेंद्र हे, अच्युत लक्ष्मण दाभोलकर व ताराबाई अच्युत दाभोलकर यांच्या दहा अपत्यांपैकी सर्वात धाकटे होय. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील माहुली या गावी झाला. सुप्रसिद्ध तत्त्वचिंतक कै. डॉ. देवदत्त दाभोळकर हे त्यांचे सर्वात थोरले बंधू होते.
शिक्षण:
नरेंद्र दाभोलकरांचे माध्यमिक शिक्षण साताऱ्यातील न्यू इंग्लिश स्कूल शाळेत झाले. त्यांनी सांगलीतील विलिंग्डन महाविद्यालयातून विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. ते राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरचे उत्तम कबड्डीपटू म्हणून क्रीडाजगतात प्रसिद्ध होते. कबड्डीवर उपलब्ध असलेले एकमेव शास्त्रशुद्ध पुस्तकही त्यांनी लिहिले. कबड्डीतील योगदानासाठी त्यांना मानाचा शिवछत्रपती पुरस्कारही मिळाला. इ.स. 1970 साली मिरज वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शाखेचे शिक्षण पूर्ण केले व त्यानंतर त्यांनी सातारा यथे वैद्यकीय व्यवसाय सुरू केला.
सामाजिक कार्य:
बाबा आढाव यांच्या एक गाव - एक पाणवठा या चळवळीत दाभोलकर यांचा सक्रिय सहभाग होता. त्यानंतर त्यांनी श्याम मानव यांच्या इ.स. 1983 साली स्थापन झालेल्या अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती मध्ये कार्य सुरू केले. पण नंतर इ.स. 1989 मध्ये त्यापासून वेगळे होऊन त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्थापन केली. साने गुरुजींनी स्थापन केलेल्या साधना या लोकप्रिय साप्ताहिकाचे ते डिसेंबर 2006 पासून मृत्यूपर्यंत संपादक होते.
अंधश्रद्धेविरोधात आयुष्यभर लढा:
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून समाजातील अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी, परंपरा मोडीत काढण्यासाठी लोकप्रबोधन करण्यात येते. महाराष्ट्र जादूटोणाविरोधी विधेयक विधीमंडळात मंजूर व्हावे, यासाठी दाभोलकर गेल्या काही वर्षांपासून कार्यरत होते. यासंदर्भात सातत्याने विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेऊन विधेयकाच्या बाजून सर्वपक्षीय मत बनवण्याचे काम ते करीत होते. समाजातील अनेक भोंदू बाबांचे पितळ दाभोलकर आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी सप्रयोग उघडे केले होते.
साहित्य:
अंधश्रद्धा : प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम - राजहंस प्रकाशन
अंधश्रद्धा विनाशाय - राजहंस प्रकाशन
ऐसे कैसे झाले भोंदू - मनोविकास प्रकाशन
ज्याचा त्याचा प्रश्न
(अंधश्रद्धा या विषयावरील नाटक - लेखक : अभिराम भडकमकर) या नाटकाचे साडेचारशेहून अधिक प्रयोग झाले आहेत.
-झपाटले ते जाणतेपण- संपादक नरेंद्र दाभोळकर व विनोद शिरसाठ.
- ठरलं... डोळस व्हायचंय - मनोविकास प्रकाशन
प्रश्न तुमचे उत्तर दाभोलकरांचे
- डी.व्ही.डी, निर्माते - मॅग्नम ओपस कंपनी.
- प्रश्न मनाचे (सहलेखक डॉ हमीद दाभोलकर)
भ्रम आणि निरास - राजहंस प्रकाशन
-विवेकाची पताका घेऊ खांद्यावरी - दिलीपराज प्रकाशन
-श्रद्धा-अंधश्रद्धा - राजहंस प्रकाशन (इ.स. 2002)
-विवेकाची पताका घेऊ खांद्यावरी - हे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे पुस्तक.
महाराष्ट्रातील अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीची पार्श्वभूमी या पुस्तकातील सर्व लेखांना आहे.
ती अशी,...
1) शोषण करणाऱ्या, दिशाभूल करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध करणे,
2) वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार करणे व त्याआधारे विविध घटना तपासणे,
ही चतु:सूत्री मनात ठेवून या पुस्तकातील सर्व लेखांकडे वाचकांनी पहावे, असे या प्रस्तावनेत नमूद केले आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनचा विचार, प्रसार, अंगीकार करण्याचे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे सूत्र या पुस्तकातील सर्व लेखांच्या मुळाशी आहे. या पुस्तकात धर्माची कृतिशील आणि विधायक चिकित्सा केलेली आहे.
#NarendraDabholkar , #नरेंद्रदाभोळकर , #विवेक_जागर_दिन
लेख संकलन आणि संपादन:
#विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख,
मुस्लिम_प्रबोधन_मंच
Post a Comment