🎓 तू झालास मूक समाजाचा नायक..!
आज दहावीच्या प्रथम भाषा मराठी विषयाच्या बोर्ड परीक्षेत आंबेडकरीं साहित्य चळवळीतील प्रख्यात लेखक आणि कवी ज. वि. पवार यांच्या ' नाकेबंदी ' ह्या काव्यसंग्रहातील ' तू झालास मूक समाजाचा नायक..' ही कविता विभाग-2 पद्य मध्ये प्रश्न क्र.2 अ ) मध्ये विचारण्यात आली..
ही कविता आज खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना प्रेरित करून गेली.. आज ह्या कवितेचं बोधप्रद समाजाला परिवर्तनाच्या दिशेने सामाजिक संघर्षाचीं प्रेरणा आणि दिशा देणारं ठरेल असा मला आशावाद आहे मित्रांनो..
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शास्वत विचार आजही अखिल विश्व मानवी मूल्य आणि कल्याणासाठी आणि सामाजिक क्रांतीसाठी पथप्रदर्शितचं आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळ्याचा जो सत्याग्रह केला त्या घटनेला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरव ह्या कवीतेतून कवी ज. वि.पवार करतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रूढ, सामाजिक परंपरा नाकारून नव्या समाजाची जडणघडण केली. अशा या समाजाच्या नायकाला कवितेतून विनम्र अभिवादन केले आहे.
डॉ. आंबेडकरांच्या कर्तृत्वाचे वर्णन या कवितेत करण्यात आले आहे.
मला ही कविता सदैव प्रेरणादायीचं आहे..माध्यमिक शालांत प्रमाणपत्र अभ्यासक्रम मंडळाचे हार्दिक आभार.. 🙏🏻
आशा करूयात विद्यार्थ्यांनीं आज परीक्षार्थीपेक्षा 'ज्ञानार्थी' भाव मनात ठेऊन ही कविता आकलन केलेली असेल...
🎓 *तू झालास मूक समाजाचा नायक..!*
तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं...
सूर्यफुलांनी पाठ फिरविली होती....
मळवाटेने जायचे नाकारलेस तेव्हा...
खाचखळग्यांनी तुझे स्वागत केले.
तू झालास परिस्थितीवर स्वार...
आणि घडविलास नवा इतिहास...
तू झालास मूक समाजाचा नायक
आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत..
तू फुंकलेस रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर...
तू तोडल्यास गुलामांच्या पायांतल्या बेड्या..
आणि केलेस उभे चवदार तळ्याच्या काठावर...
युद्धात जवानांना उभे करावे तसे....
तुझे शब्द जसे की...
महाकाव्ये तुझ्या पायाजवळ गळून पडावीत...
तुझा संघर्ष असा की...
काठ्यांच्या संगिनी व्हाव्यात...
तुझ्या डरकाळीने हादरलं आकाश;
डचमळली पृथ्वी आणि बघता बघता....
चवदार तळ्याला आग लागली.
आज पन्नास वर्षांनी अनुभवतोय...
सूर्यफुले तुझा ध्यास घेतायत...
बिगूल प्रतीक्षा करतोय...
चवदार तळ्याचं पाणी,
तेही आता थंड झालंय.
- ज.वि. पवार - ( नाकेबंदी )
-लेख संपादन
एक संविधान प्रेमी
#विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख,
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
https://www.vidhyarthimitra.कॉम
Post a Comment