समाजातील काही लोकांना काही काळासाठी मुर्ख बनवता येऊ शकते कदाचित समाजातील बहुसंख्य लोकांनाही प्रदिर्घ काळासाठी मुर्ख बनवता येईलही परंतु संपूर्ण समाजालाच आणि ते ही अनंत काळासाठी मुर्ख बनवता येऊ शकत नाही कारण अन्याय अत्याचारास उलथून टाकण्यासाठी संघर्षवान देखील याच समाजात जन्माला येत असतात आपली माणसं जेव्हा आपल्या सोबत असतात तेव्हा कितीही मोठे आवाहन पेलण्याची क्षमता आपल्यामध्ये आपो आप निर्माण होते यातून मनात आत्मविश्वास वाढतो आणि आपल्या माणसांच्या एवढ्या प्रचंड पाठींब्या मुळे लढण्याची उर्जा मिळते...
आपल्याला आपल्या क्षेत्रात टिकायचे असेल तर आपल्यावर होणारी टिका आपल्याला सहन करावीच लागेल अहंकारी माणसाला त्याचा माजच जमिनीवर आणतो विचारांची ताकद ही खूप मोठी असते जो आपल्या तत्त्वांशी विचारांशी एकनिष्ठ राहतो तोच संघर्षातून यश खेचून आणतो.
Post a Comment