सुटलो रं बाबा...! फेसबुकचा ताबा आता IT सेल कडे गेलायं..!
गेली 6 दिवस 'पोस्ट बंदी' होती...😡
'अभिव्यक्ती स्वातंत्र्य' चीं गळचेपीचं नां?🥵
सत्ताधाऱ्यांना इतकी असुरक्षितता? कदाचित 'Arab Spring' सारखी क्रांती भारतात होईल ह्याची भिती तर नाहीं ना?
गेल्या बऱ्याच महिन्यांपासून हा त्रास फेसबुकनं त्याच्या सो कॉल्ड community guidelines चं violation च्या गोंडस नियमाखाली फेसबुकवर विचार अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उदघोष करणाऱ्यांना सज्जड ईशारा दिलाय असा सर्वत्र अनुभव दिसतोय...
2014 नंतर भारतात झालेल्या सो कॉल्ड राजकीय धर्मांध क्रांतीनं.. What'sApp University आणि प्रगत समाज माध्यमांवर धार्मिक द्वेषमुलक वातावरणातून इथल्या 'सामाजिक ऐक्याला ' तडा देण्यासाठी दिवस रात्र त्या IT सेलला मोकार सोडलंय.. त्यावर कुठलंही नियंत्रण नाहीये.. ह्याची दीर्घ-शोकांतिका ह्या निमित्ताने करतोय.. 😢
संविधानिक मूल्यांशी विद्यमान उजव्या सरकारनें केलेली ही गद्दारी आणि छेडछाड 'संविधानप्रिय' असलेल्यांना कशी सहन होणार..
ते अवश्य व्यक्त होतीलचं..!त्यासाठी फेसबुकचा आधार हा प्रभावी आणि व्यापकचं आहे.. हे विचारत घेतांना इथंही 'विरोधी' आवाज दाबला जातोय... ह्याची खंत बाळगतो..
जिथं द्वंदातून संघर्ष तिथं परिवर्तन नक्कीच मित्रांनो.. पण एकच बाजूला म्हणजे उजव्यांना झुकतं माप दिली तर डावे क्रांती करणारचं..! ह्यात शंकाचं नाही..
सहिष्णूता आणि धर्मनिरपेक्षता आत्मा असलेल्या ह्या भारतभूमीत कितीही 'द्वेष' पेरा तो एकना एक दिवस एकात्मकतेचे फुलं जन्मास नक्कीच घालेल...
कुठंपर्यंत हा अनियंत्रित हुकमशहा आमचा विवेकी आणि न्यायी विचार दाबणार..!
तूर्तास थांबतो..😊
-एक संविधान प्रेमी
#विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख,
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
https://www.vidhyarthimitra.com
Post a Comment