कितना दिल जितोंगे राहुल...! हमारं पास तो एक हीं हैं..
द्रविडने नाकारला अडीच कोटींचा बोनस...!
कोचिंग स्टाफइतकेच बक्षीस द्या.!
भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने आपल्या एका धाडसी निर्णयाने क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली आहेत. द्रविडने टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर बीसीसीआयला मिळणारा 5 कोटी रुपयांचा बोनस अडीच कोटी रुपयांवर आणण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
त्यांच्या मताचा आदर : बीसीसीआय..!
द्रविड यांनी बीसीसीआयला त्यांची बक्षीसाची रक्कम कमी करण्याची विनंती केली.
सर्व प्रशिक्षकांना समान रक्कम मिळाली पाहिजे, असे राहुल द्रविड यांचे मत आहे..
'राहुल द्रविड यांना त्यांच्या उर्वरित स्टाफएवढाच बोनस घ्यायचा होता. यामुळे आम्ही त्यांच्या मताचा आदर करतो,' असे बीसीसीआयकडून सांगण्यात आले.
राहुल द्रविड...कायमचं.. आमच्या मनात घर करून गेलास.. आपलं निवृत्तीचं गाजलेलं भाषण सर्वं क्रिकेट प्रेमी, रसिक आणि हा खेळ नं आवडणाऱ्या आणि नं कळणाऱ्याच्या गळ्यातला ताईत ठरला..
क्रिकेटच्या सो कॉल्ड त्या 'देवा' पेक्षा तु बुद्धीजीवी आणि विवेकी समाजशील माणसाला तुझी परम कोटीचीं विनम्रता, सामाजिकता, विनयशीलता, विवेकी सामंजस्यता, खेळ यशस्वी करण्यासाठी पडद्यामागील माणसा आणि व्यवस्थेप्रती असलेला आदरभाव, त्यांच्या हक्कासाठी तु दिलेला लढा..
भौतिक जगात प्रत्येक जण आपली नैतिकता पणाला लावूनं एकमेकांना ओरबाडून खाणाऱ्या जमाती भौतिक संप्पती गोळा करण्याच्या उद्योगात असतांना.. तु चक्क वंचित आणि उपेक्षितांसाठी आजही कार्यरत आहेस...
सलाम तुझ्या ह्या समर्पित समरपणाला आणि सामाजिक बांधिलकीला... राहुल द्रविड...!
तुझा आदर्श आणि प्रेरणा सर्वांनी घ्यावी हीच एक आशा...
-तुझा चाहता..
#विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख,
डॉ. ए. पी.जे अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
Post a Comment