" पुस्तक म्हणजे जगण्याला...वळण देणारं साधन,...विचारांना निर्भीडता आणि आचरणाला सामर्थ्य देणारं माध्यम."
रात्रीं 10:30 चीं Air India Flight रद्द झाली आणि प्रात: सकाळचीं 4:30 च्या Flight मध्ये आमचं Adjustment झाल्याचीं घोषणा Indira Gandhi विमानतळावर कळलं..
प्रात:सकाळ आणि तेही दोन तासांपूर्वी Security Check up साठी Boarding Pass काढून Gate No. 4 वर पोहचण्याचं नियोजन ठरलं पण तोपर्यंत आपला परम स्नेहीं मित्र पुस्तक सोबत असताना.. त्याचं सानिध्य मिळेल ह्या आशेवर Airport वर एक मोक्याचीं आणि सुरक्षित जागेवर एका कॉफी सोबत आपलं वाचन सुरू झालं..
इतरत्रहीं अनेक माणसं मोबाइल पेक्षा काहीतरी वाचण्यात Flight चं वेळा-पत्रक बघण्यात Boarding Passes घेण्यात व्यस्त असल्याचं दिसत होती..
Indira Gandhi International Airport हे Domestic हीं असल्याने Terminal -3 वर 24 तास विमान प्रवासांनी भरगच्च आणि व्यस्त दिसत होता..
विविध भाषामधील प्रवासांचे एकमेकांशी असलेले संवाद, त्यांची देह -बोली, फर्निश भाषा शैली, युवकांनी मोबाईल मध्ये तोंड -नाक आणि मुंडकं खुपसून बसलेली त्यांची व्यस्तता.. ई आदी गोष्टीनं मन वेधून घेतं.. स्वतःचा शोध घेण्याचीं धडपड असलेलं आपलं प्रगल्भ वाचनांचीं सवय 'ज्ञानजिज्ञासा' चीं कायम ओढ राहिली..
शालेय शिक्षणापासून वाचनांचीं आवड, महाविद्यालयिन जिवनांतील प्रगल्भ वाचन, व्यवसायिक जीवनात आयुष्य समृद्ध करण्यासाठी क्षण नं क्षण ज्ञान कण वेचण्याची ज्ञान लालसा, प्रवासात जिथं गेलो तिथं पुस्तकं आणि ग्रंथ खरेदी ठरलेलीचं..
तरीही आजच्या दिल्ली वारीत 'दरया गंज ' मिस झालं.. मागच्या Book Fair and Fest च्या निमित्ताने पुस्तकं प्रकाशन व्यवसायिकांची ओळख झाली, सातत्याने तें हीं नेहमीच हिंदी साहित्य आणि शैक्षणिक प्रकाशनांच्या पुस्तकं नोंदीत Review Copies पाठवीत असतातचं..
पण माझं विशेष प्रेम हे मराठीवरचं..!
क्रमश :
एक सह-प्रवासी...
#विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
#आम्ही_पुस्तक_प्रेमी
Post a Comment