डॉ. आ. ह. साळुंखे यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर, महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे शरद जावडेकर यांना समाजकार्य विशेष पुरस्कार.
अमेरिकेत स्थायिक झालेल्या मराठी माणसांनी स्थापन केलेल्या सुनील देशमुख महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीने ज्येष्ठ संशोधक-विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांना साहित्य जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे... तर, शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभेचे कार्याध्यक्ष शरद जावडेकर यांना समाजकार्य विशेष पुरस्कार जाहीर झाला आहे.
आमचे मार्गदर्शक गुरुवर्य, अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभेचें कार्यध्यक्ष आदरणीय शरद जावडेकरांच्या कार्यास सलाम..
S. M. Joshi Socialist Foundation मध्ये 'मुस्लिम शिक्षण' परिषदेच्या निमित्ताने आपला वैचारिक सहवास लाभला..
अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभा ही संस्था शिक्षण हक्कांसाठी कार्यरत आहे. तिचं मुख्य उद्दिष्ट शिक्षण क्षेत्रातील समता, गुणवत्ता, आणि समान हक्क प्रस्थापित करण्यासोबत शिक्षणातील समानता, मोफत आणि सक्तीचं शिक्षण, वंचित घटकांतील शिक्षणाचें मूलभूत प्रश्न यावंर आपलं कार्य हे नेहमीच विविध वर्तमानपत्रातुन वाचायला मिळतं, वेळोवेळी आपण करीत असलेलं मार्गदर्शन हे नेहमीच आमच्या कार्यास बळ देणारं आहे..
महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा यंदाचा 'समाज कार्य विशेष ' पुरस्कार हा आपल्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचा खऱ्या अर्थानें गौरव आहे, ह्याबद्दल आपलं विशेष अभिनंदन आदरणीय गुरुवर्य शरद जावडेकर सर..
- आपलाच स्नेहांकीत
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
Post a Comment