आपल्या मूल्यव्यवस्थेची पातळी ही मानवी हक्कांच्या तत्त्वांच्या अंमलबजावणीशी थेट जोडलेली असते. आपल्या दैनंदिन व्यवहारात, सामाजिक संबंध, कामकाजाच्या ठिकाणचे संबंध, आपल्या धार्मिक समजुती आणि आपण आपल्या कुटुंबीयांना व स्वतःला कशी वागणूक देतो, इत्यादीत आपण मानवी मूल्यांची जपणूक कशी करतो हे तपासावयाचे असेल, तर आपणास स्वतःला काही प्रश्न विचारावे लागतील.
आपण परस्परांच्या हक्कांचा आदर राखतो का? आपण एकमेकांचा सन्मानाने जगण्याचा हक्क मान्य करतो का? रोजच्या जीवनात समता, न्याय आणि शांतता या तत्त्वांना आपण चालना देतो का? आपल्या आयुष्यात आलेल्या माणसांचा आपण आदर करतो का? त्यांची काळजी घेतो का?
आपण एका समाजसंस्थेचा भाग असल्यामुळे इतर सर्व माणसांना आदरपूर्वक वागविले पाहिजे म्हणून प्रयत्नशील असतो का? या सर्व प्रश्नांची प्रामाणिक उत्तरे मिळाली तर त्यातून मूल्यव्यवस्था आणि मानवी हक्कांची प्रत्यक्ष स्थिती यामधील संबंध स्पष्ट होईल.
Post a Comment