तुम्ही अस्वस्थ आहात का ??🙄
फार दिवसांपासून ....!
जर अस्वस्थ असाल तर मग ती अस्वस्थता कार्यान्वित करा..
अस्वस्थतेमध्ये इतिहास घडवण्याची मोठी क्षमता असते.
गरज आहे ती फक्त एका विधायक दिशेची....ही दिशा तुम्हाला ठाऊक असेल आणि तुम्ही तुमच्या अस्वस्थतेला त्या दिशेने कार्यान्वित केले की मग प्रचंड काम उभे राहते...
अस्वस्थता ही दुधारी तलवार आहे. हातपाय गाळून अस्वस्थतेला सामोरे गेलात की तुमचा भविष्यकाळ अंधारलेला असेल. याऐवजी अस्वस्थता ही संधी मानलीत तर मग भविष्यकाळात तुमच्या हातून तुमच्या नावाचा इतिहास लिहिला जाऊ शकतो.
अस्वस्थता ही वैयक्तिक व सामाजिक अशा दोन्ही कारणाने येते.
कारणे काही असली तरी विधायक दिशेने चालत रहा...
तुमचा इतिहास तुमची वाट पाहत उभा असलेला तुम्हाला दिसेल.
अस्वस्थतेला संकट समजू नका , तिचे संधीत रुपांतर करा..
संधीची वाट पाहू नका; ती स्वतःच शोधा आणि कामाला लागा.
अनेक लोक संधीची वाट पाहतात. आज संधी मिळेल, उद्या संधी मिळेल अशा आशेवर ते दिवस काढतात; पण संधी काही त्यांचे दार ठोठावत नाही. मग अशा लोकांना निराशा येते. संधीची वाट पाहण्यापेक्षा संधी शोधण्याचा प्रयत्न करावा. ती मिळताच कामाला लागावे.
आजकाल शिकलेल्या लोकांचा नोकरीकडे जास्त कल आहे. यासाठी ते हवे तेवढे पैसे मोजायला तयार असतात. तेवढ्या पैशात स्वतःचा उद्योग-व्यवसाय उभारण्याचा सल्ला कुणाला दिला तर पटत नाही. एखाद्याला जीवनात संधी मिळाली की त्याचे सोने करायचीदेखील कुणाची तयारी नसते. साऱ्या गोष्टी आयत्या मिळाल्यावर त्याचे महत्त्व राहत नाही असे म्हणतात.
Post a Comment