🔰 सदिच्छा ग्रेट भेट : एक प्रेरणादायी संवाद...
स्नेही आणि वैचारिक मित्र शिवश्री सखारामजी रणेर..
(राज टेलर - प्रसिद्ध युवा उद्योजक, परभणी.)
"शिंपल्यासारखी खूप कमी लोक असतात या जगात,
ते दुसऱ्यांना मोत्यासारखं घडवायला स्वतःचा स्वार्थ बघत नाहीत..!!"
माणसं जोडणारा, नाती जपणारा आणि समाजासाठी सतत कार्यरत असणारा एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व..!
गेल्या काही वर्षांपासून फेसबुकच्या माध्यमातून आपली वैचारिक मैत्री, आपल्या सामाजिक कार्याची जाणीव, मित्रमंडळींमधून ऐकलेले आपले कौतुक आणि समाजमाध्यमांवर आपल्या कार्याची झालेली सकारात्मक चर्चा,या साऱ्या गोष्टींमुळे आपणास प्रत्यक्ष भेटण्याची उत्कंठा मनात होती. काल वाढदिवसाच्या निमित्ताने सदिच्छा भेट राहून गेली होती, पण आज सुट्टीच्या दिवशी आपल्या व्यवसायिक दालनात झालेल्या भेटीमुळे ती उणीव भरून निघाली.
आपल्याशी साधलेल्या संवादातून आपल्या कार्यप्रेरणेचा, सामाजिक बांधिलकीचा आणि ग्रामीण भागातील युवकांसाठी आपण करत असलेल्या शैक्षणिक, सामाजिक व औद्योगिक योगदानाचा जवळून प्रत्यय आला. आपल्या प्रामाणिक समाजसेवेच्या तळमळीमुळे आणि सर्वोच्च मित्रसंपत्तीमुळे मी अतिशय प्रभावित झालो आहे.
सहिष्णू आणि पुरोगामी विचार असलेल्या आपल्या सारख्या स्नेही मित्रांची साथ ही माझ्या जडण-घडणीचा महत्त्वाचा भाग आहे. आपण शिक्षण आणि समाजसेवेच्या माध्यमातून समाजातील इतरांना प्रेरणा देता, ही अभिमानास्पद गोष्ट आहे.
आम्हांस आपला सार्थ अभिमान.. 🙏
आपल्या कार्यास मनःपूर्वक शुभेच्छा आणि सदिच्छा मित्रा..!
आपलाच विनम्र स्नेहांकित व शुभेच्छुक:🙏
#विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख
🎓 डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी
https://www.vidhyarthimitra.com
Post a Comment