🎓आशा आणि संघर्ष... ✍️
दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी एक प्रेरणादायी गोष्ट...!
अभ्यास करताय ना..! टेन्शन आलंय का..! मग एकदा ही स्टोरी नक्की वाचा आणि शेअर ही करा मित्रांनो.. 🙏
एक आशेचा नवा किरण गवसेल बरं का.. 😄
1950 च्या दशकात हार्वर्ड विद्यापीठातील प्रसिद्ध वैज्ञानिक कर्ट रिचटर यांनी एका उंदरांवर एक अनोखा प्रयोग केला.
कर्ट यांनी एका काचेचा जार पाण्याने भरला आणि त्यात एक उंदीर सोडला...उंदीर पाण्यात पडताच घाबरून जोरात धडपडू लागला.
तो त्या जार बाहेर येण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करू लागला.
काही मिनिटे धडपडल्यानंतर मात्र त्याने आशा सोडली आणि तो पाण्यात बुडून मरण पावणार..
तेवढ्यात कर्ट यांनी त्याला बाहेर काढले...!
यानंतर कर्ट यांनी प्रयोगात थोडा बदल केला...
ते पुन्हा त्या उंदीराला जार मध्ये टाकतात...
तो पुन्हा जीवाच्या आकांताने संघर्ष करतो.
जेव्हा उंदीर दमला आणि बुडण्याच्या जवळ पोहोचला, त्याच क्षणी कर्ट यांनी त्याला पुन्हा एकदा पाण्यातून बाहेर काढले.
उंदीर अजूनही जिवंत होता....
काही वेळ त्याला आराम दिला, मायेने गोंजारलं आणि नंतर तोच उंदीर पुन्हा त्या पाण्याच्या जार मध्ये टाकला.
आता जे झाले, ते पाहून कर्ट स्वतःही थक्क झाले..!
पहिल्यांदा 15-20 मिनिटांत हार मानणारा तोच उंदीर, या वेळी तब्बल 60 तास संघर्ष करत राहिला..!
होय, 60 तास तो जार मध्ये पोहत राहिला, धडपडत राहिला,झुंजत राहिला आणि संघर्ष करीत राहिला...
हे पाहून रिचटर कर्ट यांनी या प्रयोगाला नाव दिले –
"The HOPE Experiment" म्हणजे "आशेचा प्रयोग"
कधीही हार मानणारा तो उंदीर, या वेळी इतका दीर्घकाळ झुंजत राहिला, कारण त्याच्या मनात "आशा" निर्माण झाली होती.
पहिल्या वेळी त्याला वाचवले गेले होते, त्यामुळे त्याला वाटले..
"माझे जीवन वाचू शकते!"
याच आशेने त्याने 60 तास संघर्ष केला.
🔰विद्यार्थ्यांसाठी शिकवण:...
✅ आशा सोडू नका.
✅ संघर्ष करत राहा.
✅ मनाने हार मानू नका, स्वतःवरचा आत्मविश्वास वाढवा.
✅अभ्यासाचं उत्तम नियोजन करा.
✅परीक्षा काळात मोबाईल फोनचा कमीत कमी वापर करा.
✅आपल्या अभ्यासाची खरी परिस्थिती आपल्या पालकांच्या लक्षात आणून द्या, त्यांच्याशी मनमोकळ्या पद्धतीने संवाद साधा.
✅ चांगल्या आणि अभ्यासू मित्र मंडळीत आपला वावर असू द्या.
✅परीक्षा काळात संतुलित आहार, हलका व्यायाम ठेवा.
✅ मनाच्या एकाग्रतेसाठी पुरेशी झोप घ्या.
✅ मानसिक आरोग्य जपा.
✅ स्वतःच्या क्षमता,आवड, कौशल्ये आणि सवडीप्रमाणे आपला अभ्यास करा.
✅ परीक्षा काळात ताण-तणाव घेऊ नका.. स्ट्रेस येत असल्यास त्यांच व्यवस्थापन करायला शिका मित्रांनो..
✅ तुमचा संयम आणि कठीण परिश्रम तुम्हाला यशापर्यंत नेईल.
"परीक्षा म्हणजे स्वतःच्या आत डोकावण्याची उत्तम संधी आहे मित्रांनो.."
परीक्षा म्हणजे केवळ गुण किंवा यश-अपयश नाही, तर स्वतःच्या आत डोकावण्याची, स्वतःला ओळखण्याची आणि सुधारण्याची एक उत्तम संधी आहे.
✅ परीक्षा आपली क्षमता किती आहे, हे मोजण्याचे साधन आहे.
✅ ती आपल्याला मानसिक, बौद्धिक आणि भावनिक ताकद वाढवण्याची संधी देते.
✅ यश मिळाले तर आत्मविश्वास वाढतो, अपयश आले तरी चुका सुधारून पुढे जाण्याची संधी मिळते.
म्हणूनच, परीक्षेला एक संधी म्हणून पहा – भीती म्हणून नाही.!
परीक्षा, स्पर्धा, किंवा कोणत्याही कठीण प्रसंगात – संघर्ष करा, आशा ठेवा आणि यशस्वी व्हा!
स्वतःवर विश्वास ठेवा, पूर्ण ताकदीने प्रयत्न करा आणि नक्कीच यशस्वी व्हा..!
"तुमच्या प्रत्येक प्रयत्नात यश असेल, फक्त आशेचा दीप कधीही विझू देऊ नका."
आम्ही आहोतचं आपल्या मदतीला मित्रांनो..
©विद्यार्थीमित्र.. ✍️
-आपलाच शुभेच्छुक:
#विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख..
शैक्षणिक सल्ला आणि समुपदेशनासाठी आपण आम्हाला व्हाट्सअपवर किंवा फोनवर संपर्क करू शकता मित्रांनो..
🎓 डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी
https://www.vidhyarthimitra.com
Post a Comment