बुद्धांच्या भूमीवर आम्ही
ठरवलो गेलो वेळोवेळी धर्मद्रोही,
संतांच्या भूमीत जन्मलो आम्ही
महापुरुषांच्या विचारांने विद्रोही।
सहिष्णुतेच्या मशाली घेऊन
तरीही उजळवतो मानवतेचा स्नेही,
अन्यायाशी झुंजणारे हात आम्ही
आमच्याच भूमीत ठरलो परके कहीं।
आम्ही घेतली शिकवण संतांची,
प्रेम, करूणा आणि समतेची,
तरीही वाटेवर काटे टाकणारे
झालो इतिहासाच्या जखमेची।
द्वेषाची वारे जरी वाहू लागली
अविचारांचे धुके पसरू लागले,
तरी सत्याच्या दीपासम आम्ही
नव्हे कधीच मावळू पाहिले।
मनामनातील द्वेष हरवून
बंधुत्वाचा मंत्र जपू,
एकमेकांच्या हातात हात घालून
सर्व मानवतेस एकत्र नेऊ।
ना भेदभाव, ना उच्च-नीचता,
सत्य, अहिंसेचे व्रत धरू,
मानवी जीवनमूल्य जपत
नवसंस्कृतीचा दीप उजळू।
हीच आमची वाटचाल राहो,
सर्वधर्म समभाव नांदो,
प्रेम, करुणा आणि सहिष्णुतेने
नवा जगाचा प्रकाश पाडो।
-संपादीत काव्य..✍️
विद्रोही कविता..
-अमोल लांडगे आणि विद्यार्थी मित्र प्रा. रफीक शेख
Post a Comment