सआदत हसन मंटो...!
हे नाव उच्चारताच, वादग्रस्त सत्याचं एक स्फोटक चित्र डोळ्यांसमोर उभं राहतं. मंटो म्हणजे एक काळजाला चिरणारा संवेदनशील लेखक, ज्याच्या लेखणीत ताठ मानेने चालणाऱ्या समाजाच्या ढोंगी मुखवट्यांची चिरेबंद उकल होते.
🎓 जीवन परिचय...
पूर्ण नाव: सआदत हसन मंटो
जन्म: 11 मे 1912, लुधियाना, पंजाब (ब्रिटिश इंडिया)
मृत्यू: 18 जानेवारी 1955, लाहोर, पाकिस्तान
शिक्षण: अमृतसर व अलीगढ मुस्लिम विद्यापीठ
कार्यक्षेत्र: कथा, नाटक, रेडिओ पटकथा, चित्रपट संवाद
मंटोचं बालपण आणि तारुण्य ब्रिटिश भारतात घडलं.त्यांनी सुरुवातीला फ्रेंच साहित्याचं भाषांतर केलं, ज्यामुळे त्यांच्या विचारांची धार अधिक तीव्र झाली. त्यांच्यावर व्हिक्टर ह्युगो आणि ऑस्कर वाईल्ड यांचा प्रभाव होता.
मंटोच्या लेखणीत दोन गोष्टींचं वर्चस्व आहे — मानवी मनाची गुंतागुंत आणि समाजातील ढोंगाविरुद्ध उघड बंड.
"अगर आप इन कहानियों को बर्दाश्त नहीं कर सकते, तो इसका मतलब यह है कि ये ज़माना ही नाक़ाबिल-ए-बर्दाश्त है।"
मंटो partition च्या काळातल्या विभक्त भारत-पाकिस्तानच्या वेदना आणि माणसातल्या जनावराची ओळख करून देतात.. त्यांच्या कथा टोंबा टेक सिंग, ठंडा गोश्त, काली शलवार, बू, आणि खोल दो या त्यांच्या अनघड पण अस्सल शैलीसाठी गाजल्या.
मंटोने बॉम्बेमध्ये चित्रपटांसाठी पटकथा लिहिल्या...
त्याचे लिखाण प्रेम, लैंगिकता, दारिद्र्य, स्त्री-पुरुष संबंध, आणि हिंसा या कडवट पण वास्तव विषयांवर आधारित होतं.
पाकिस्तानात स्थलांतर केल्यावर, ते सामाजिक अस्वस्थतेचा आवाज झालें..
त्यांच्यावर अश्लीलतेच्या आरोपाखाली सहा वेळा खटले चालवले गेले, पण ते मागे हटलें नाही.
🎓मृत्यू आणि वारसा..
मंटो केवळ 42 व्या वर्षी मद्यपानामुळे मृत्यू पावलें, पण त्यांनी एवढ्या अल्पावधीत जे लिहिलं ते अजूनही काळजाचा ठाव घेऊन जातं.
त्यांच्या कबरीवर लिहिलं होतं...
"यहाँ सआदत हसन मंटो दफ़न है जो अब भी यह समझता है कि वह बड़ा अफ़सानानिगार है।"
मंटो हे फक्त लेखक नव्हते — ते काळाचं आरसपण होतं. त्यांचे शब्द नाकाबंदीतील तणाव, स्त्रीच्या वेदना, आणि माणसाच्या पाशवी वृत्ती यांचं नग्न दर्शन घडवतात. त्यांच्या साहित्याला 'विवादास्पद' म्हणून झाकण्याचा प्रयत्न झाला, पण अखेर ते 'सत्याचा बिनधास्त साक्षीदार' म्हणून अमर ठरलेत..
आज त्यांचा स्मृतिदिन...
त्या निमित्तानें विनम्र अभिवादन 🙏
Post a Comment