संघर्ष... हे एकच शब्द पण त्यात संपूर्ण विश्व दडलं आहे...
जीवन नावाच्या महासागरात जर लाटा नसतील, तर ती सरोवराची शांतता असते; पण ती शांतता म्हणजे स्थिरता, स्थिरता म्हणजे मृत्यू...लाटांमुळेचं समुद्र जिवंत असतो, त्यात खळबळ असते, त्यात उर्मी असते.
आपलं आयुष्य देखील असंच आहे...लाटा म्हणजे अडथळे, वादळं म्हणजे संकटं, पण हाच तर प्रवास आपल्याला किनाऱ्यापर्यंत घेऊन जातो.
"संघर्ष हेच जीवन आहे…" हे फक्त चार शब्द नाहीत, तर आयुष्याचा निखळ सत्याचा मंत्र आहे. ज्याला संघर्ष नाही, त्याला कसला आनंद, कसली जाणीव, कसली ओळख?
हार म्हणजे मृत्यू नव्हे...
" संघर्ष हेच जीवन आहे...जोपर्यंत आपण हार मानत नाही,
तो पर्यंत कोणाच्या बापाची हिम्मत नाही आपणाला हरवायची.!!"
ही ओळ वाचली की अंगावर रोमांच उभे राहतात.
कारण ही केवळ एक वाक्यरचना नाही, तर एक अढळ विचार आहे.
हरवतो तोच, जो आधीच मनाने हरतो. जोपर्यंत तू स्वतःच्या मनाला सांगत नाहीस, "बस, आता नाही!" – तोपर्यंत जगातील कुठलीही ताकद तुला जमिनीवर पाडू शकत नाही.
संघर्ष म्हणजे काय..?
संघर्ष म्हणजे नुसती भांडणं नव्हेत, संघर्ष म्हणजे नुसती लढाई नव्हे,
संघर्ष म्हणजे जीवनाच्या काटेरी रस्त्यावर न थांबता चालत राहणं.
कधी उपासमारीशी संघर्ष, कधी अन्यायाशी संघर्ष, कधी स्वतःच्या भीतीशी, कमकुवतपणाशी संघर्ष...हा संघर्ष एकदम वैयक्तिक असतो, प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळा असतो, पण त्याची फळं मात्र समान असतात – अनुभव, शिकवण, आणि उभारी.
का आवश्यक आहे संघर्ष..?
जर संघर्ष नसेल तर आयुष्य गोडसर, पण नीरस होऊन जातं.
जगणं मग एक यांत्रिक गोष्ट बनून राहतं. संघर्ष म्हणजे जीवनाचा मीठ आहे. तो नसला तर यशाचं कुठलंही पक्वान्न बेचव आणि सपक लागतं.
संघर्षच आपल्याला माणूस म्हणून घडवतो. एखादं शिल्प पाडायचं असेल तर मूर्तिकाराने हातोडा मारलाच पाहिजे. त्याच हातोड्याच्या घावांमधून सौंदर्य जन्म घेतं. तसंच आयुष्य आहे..संकटांचे घाव म्हणजे नियतीचा हातोडा आणि घडणारी मूर्ती म्हणजे आपण..!
प्रत्येक टप्प्यावरची लढाई..
बालपण - खेळण्यांसाठी रडणं नाही, तर शिक्षणासाठी धडपडणं हाही संघर्षच...!
तरुणपण – स्वप्नांच्या मागे धावणं, असंख्य दारं बंद होताना पाहणं, तरीही चालत राहणं – हाही संघर्षचं कीं.. मित्रांनो..
प्रौढपण – कुटुंब, कौटुंबिक जबाबदाऱ्या, आणि स्वतःची ओळख यांची तारेवरची कसरत – हाही संघर्षच.
शेवटी जीवन म्हणजे प्रत्येक टप्प्यावर न थांबता, थकूनही पुन्हा उभं राहून चालत राहणं.
इतिहास बोलतो – संघर्षाशिवाय यश नाही...
सह्याद्रीत जन्मलेला एक लहानसा बालक जर संघर्षाला घाबरला असता तर आज जग त्याला शिवाजी महाराज म्हणून ओळखलं असतं का..?
महात्मा गांधींनी संकटांचा डोंगर पाहून घरी बसून दिलं असतं तर आपलं स्वातंत्र्य कुठे आलं असतं?
डॉ. कलाम यांना गरिबीच्या रात्रींनी झोप घालवली असती, आणि त्यांनी हार मानली असती, तर भारताला ‘मिसाइल मॅन’ मिळाला असता का?
इतिहासाचं प्रत्येक सुवर्णपान रक्ताने नाही, तर संघर्षाने लिहिलं गेलं आहे.
संघर्ष आणि संयम..
संघर्ष जिंकण्यासाठी दोन शस्त्रं असतात...
एक जिद्द आणि दुसरा संयम..
जिद्दीशिवाय प्रयत्न नाही, आणि संयमाशिवाय प्रयत्नाला दिशा नाही...जग रोज आपल्याला थांबवण्याचा प्रयत्न करेल. लोकं हसतील, बोलतील, आपल्या अपयशाला मोठं करून दाखवतील. पण ज्याचं मन स्थिर आहे, त्याला जग कधीच हलवू शकत नाही.
अपयशाची भीती नकोचं..
अपयश म्हणजे शेवट नाही; अपयश म्हणजे पुढच्या यशाचा पाया आहे. एकदा नाही जमलं, दोनदा नाही जमलं तरी तिसऱ्यांदा प्रयत्न केलाच पाहिजे...
डोंगर एकाच घावाने फोडता येत नाही; वारंवार हातोडा मारावा लागतो, तेव्हाच शिल्प बाहेर येतं मित्रांनो..
आधुनिक संघर्ष – दिसत नाही पण जास्त जड..
आजच्या काळात संघर्षाचं रूप थोडं बदललं आहे. आधी लढाई उघडपणे व्हायची – शत्रू समोर असायचा... पण आजचा शत्रू आपल्याचं मनात आहे.
नैराश्य,एकाकीपणा,नकारात्मकता, तुलना, प्रचंड जीवघेणी स्पर्धा.. स्वतः चं अस्तित्वाची लढाई..ही आजची आधुनिक रणभूमी आहे.
आजच्या या अदृश्य रणभूमीवर,तलवारी आणि ढालींचा काळ संपलाय...तलवारीऐवजी आज आपल्याला हवे आहेत..
धैर्याचा तेजस्वी कवच, प्रामाणिकपणा, सामाजिक भान, जागरूकतेचा दीपस्तंभ, स्व-अभ्यासाची धारदार तलवार, संयमाची थंड सावली आणि स्वतःवरच्या प्रगाढ विश्वासाची सिंहगर्जना..
हे अस्त्र बाळगलं तर जगातील कोणतंही वादळ आपल्याला हलवू शकणार नाही मित्रांनो..
स्वतःवर विश्वास ठेवा..
जगातील कोणतीही शक्ती आपणास हरवू शकत नाही,
जर आपण स्वतःवर विश्वास ठेवला तर...
हा विश्वासचं आपल्याला वादळातही उभं राहायला शिकवतो.
स्वतःवरचा विश्वास म्हणजे अंधारातल्या वाटेवरचा दिवा.
म्हणूनच, मित्रांनो संघर्षाला घाबरू नका..
तोच तुमचा गुरु आहे, तोच तुमचा खरा मित्र आहे.
संघर्षाशिवाय जीवनाला रंग नाही, गंध नाही.
जग तुम्हांला थांबवेल, पण आपण ठरवलंस तर आपल्याला कोणीच थांबवू शकत नाही.
आजपासून स्वतःला वचन द्या..
पडलो तरी पुन्हा उभा राहीन...
हसलं तरी चालेल, टोमणे सहन करीन, पण थांबणार नाही.
आणि माझ्या संघर्षाचं सोनं करून दाखवीन...
पायात काटे असतील, डोळ्यात अश्रू असतील, तरीही चालत राहा;
कारण जोवर श्वास आहे, तोवर कुणाच्याही बापाची हिम्मत नाही
मला हरवायची..!
धन्यवाद मित्रांनो..!
लेख आवडला असेल, तर आपल्या प्रियजनांसोबत नक्कीच शेअर करा.
सकारात्मक विचार शेअर करणे हीच मानसिक आणि सामाजिक शक्ती वाढवण्याची सर्वात मोठी ताकद आहे. जेव्हा आपण प्रेरणादायक विचार इतरांसोबत वाटतो, तेव्हा ती ऊर्जा द्विगुणित होते आणि आपले जीवन अधिक सकारात्मक आणि समृद्ध बनते. त्यामुळे, चांगल्या गोष्टी शेअर करत राहा आणि एकमेकांना पुढे जाण्यास प्रेरित करा मित्रांनो..!
-विचार संकलन आणि संपादन.. ✍️
-एक पुस्तकप्रेमी आणि समाजमाध्यमकार..
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख
The Spirit of Zindagi Foundation
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
https://www.vidhyarthimitra.com
#संघर्ष, #Motivation, #LifeLessons, #Hardwork, #NeverGiveUp, #Inspiration, #Success, #SelfBelief, #PositiveVibes, #Zindagi, #Goals, #Dedication, #DreamBig, #LifeMotivation, #MarathiMotivation, #MarathiQuotes, #InspirationalQuotes, #BelieveInYourself, #BeStrong, #StruggleToSuccess, #SuccessMindset, #MarathiStatus, #LifeChanging, #NeverStop, #GrowthMindset, #MindsetMatters, #PowerOfPositivity, #DailyMotivation, #LifeIsStruggle, #StruggleStory , #ThinkPositiveChallenge , #marathithoughts , #SelfImprovementChallenge , #motivationalquotes , #viralthoughts2025 , #marathivichar , #learningthroughplay , #courage , #StayStrongStayHealthy , #wisdomquotes ,#संघर्ष, #जीवन, #प्रेरकविचार #यशोगाथा #जिद्द, #मेहनत, #स्वतःवरविश्वास, #प्रेरणादायीविचार , #विचारवंत , #संयम, #स्वप्नपूर्ती, #यशोगाथा, #यशाचीकिल्ली, #ध्येय, #धैर्य, #मनोधैर्य, #सकारात्मकविचार, #आयुष्य, #स्वप्नं, #शिकणे, #मराठीविचार, #मराठीतप्रेरणा , #विचारसरणी
Post a Comment