आजच्या लोकमत मध्ये एकाच पानावर...
हे दोन शब्द डोळ्यासमोर आले आणि मन अक्षरशः सुन्न झालं!
कधी विचार केला का मित्रांनो,
भारतासारख्या संपन्न भूमीत
दर एका मिनिटाला का एखादं स्वप्न,
एखादी आशा, एखादं कुटुंब विझतंय..?
हा आकडा फक्त आकडा नाही,
तो आपल्या समाजाच्या संवेदनाहीनतेचा आरसा आहे.
वृत्तपत्रांच्या पानांवर हे फोटो, हेडलाईन्स,
आपल्याला क्षणभर अस्वस्थ करतात
पण दुसऱ्याच क्षणी आपण मोबाईल स्क्रोल करत
पुन्हा आपल्या दिनचर्येत हरवतो...
सरकार? व्यवस्था?
हो, त्यांचं उत्तरदायित्व आहेच,
पण समाज म्हणून आपण?
आपल्या सभोवतालच्या हताश, हरवलेल्या लोकांकडे
कधी मायेचं कान देऊन ऐकलंय का?
कधी हात देऊन थांबवलंय का?
आत्महत्या हा प्रश्न फक्त धोरणांचा नाही,
तो माणसा माणसांमधल्या नात्यांच्या तुटण्याचा आहे.
सहानुभूती, संवाद, समजूत...
हे तीन शब्द पुन्हा आपल्या जीवनात आणले नाहीत तर ही थंड भीषण हेडलाईन्स उद्या आपल्या घरच्या दाराशीही येऊ शकतात.
काय वाटतं मित्रांनो? कधी बदल घडवणार?
आपण बदलणार, की पुढचं पान वाचून
आपली संवेदना पुन्हा झोपवून टाकणार?
संदर्भ आणि स्रोत : लोकमतच्या सौज्यनानें साभार

Post a Comment